Home /News /entertainment /

आलिया भट्टने पोस्ट केले Cute Photos, पण फोटोंपक्षा चर्चा अर्जुन कपूरच्या कमेंटची; वाचा काय म्हणाला अभिनेता

आलिया भट्टने पोस्ट केले Cute Photos, पण फोटोंपक्षा चर्चा अर्जुन कपूरच्या कमेंटची; वाचा काय म्हणाला अभिनेता

आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Alia Bhatt Instagram) काही फोटोज शेअर केले आहेत. दरम्यान या फोटोपेक्षा या फोटोवर अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने केलेल्या कमेंटमुळे चांगलीच चर्चा सुरू झालीय.

मुंबई, 20 जानेवारी: अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt Latest News) सध्या वेगवेगळ्या सिनेमांच्या प्रोजेक्टवर काम करतेय. स्वतःच्या व्यस्त असणाऱ्या वेळापत्रकातही ती सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच आलियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर (Alia Bhatt Instagram) काही फोटोज शेअर केले आहेत.  दरम्यान या फोटोपेक्षा या फोटोवर अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) याने केलेल्या कमेंटमुळे चांगलीच चर्चा सुरू झालीय. आलिया ही नेहमीच तिच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रीय असून, तिच्या आयुष्याशी संबंधित अपडेट्स फॅन्स आणि फॉलोअर्ससोबत शेअर करत असते. तिने नुकतेच काही फोटो शेअर केलेत. त्यात ती एकदम फ्रेश आणि सुंदर दिसत आहे. आलियाच्या या फोटोंना चाहत्यांनी चांगलीच पसंती दिली. अभिनेता अर्जुन कपूरने याच फोटोवर एक कमेंट दिली, आणि त्यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. हे वाचा-रविनाची मुलगीही आहे ग्लॅमरस, फॅशनबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींनाही देते टक्कर आलियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर चार फोटो शेअर केलेत. या फोटोत ती एका फुलाच्या मागे उभी असल्याचे दिसतेय. 'सूर्य आणि या फुलांसह'.. असे लिहित तिने हा फोटो शेअर केलाय. अर्जुन कपूरने या फोटोंवर 'इन दा बाग...' ( In Da Baug... ) अशी कमेंट दिली असून ती व्हायरल झाली आहे. या कमेंटला 1000 हून जास्त लोकांनी लाइक केले आहे. या कमेंट वर चर्चाही सुरू झालीय.
काही फॉलोअर्सना ही कमेंट समजली नाही. त्यामुळे त्यांनी अर्जुनला याबद्दल विचारले. तर, ज्यांना समजली त्यांनी फायर इमोजी टाकत या कमेंटला लाइक केले. काहींनी हार्ट इमोजी टाकत लाइक केले. या कमेंटचा अर्थ सांगताना एका फॉलोअरने लिहिले की, आलिया सध्या अलिबागमध्ये आहे. अर्जुनने 'अलिबाग' आणि 'बाग' या दोन्ही ठिकाणांचा उत्तम वापर करून आलियाचे लोकेशन एक प्रकारे सांगितले आहे. अर्जुनचे हिंदीचे ज्ञान पाहून काही चाहते प्रभावित झाले. आलिया भट आणि अर्जुन कपूर ‘टू स्टेट्स’ चित्रपटात एकत्र दिसले होते. हे वाचा-आणखी एक वेगळी भूमिका घेऊन येतोय 'श्री', लवकरच नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलिया यावर्षी संजय लीला भन्साळींच्या 'गंगूबाई काठियावाडी' आणि अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ब्रह्मास्त्रमध्ये ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत स्क्रीन शेअर करेल. हा एक सुपरहिरो असलेला चित्रपट आहे, ज्यामध्ये रणबीर 'शिवा' नावाची व्यक्तिरेखा साकारत आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन हे सुद्धा दिसणार आहेत. या वर्षी आलियाचे रणबीरशी लग्न होणार असल्याची चर्चाही सुरू आहे. कारण गेल्या काही वर्षांपासून ती त्याला डेट करतेय. त्यातच आलिया रणबीर सोबत प्रथमच 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करीत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे. दुसरीकडे विविध चित्रपटांचे प्रोजेक्ट असतानाही आलिया सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात आहे. आलिया ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असते. सोशल मीडियावर शेअर केलेल्या तिच्या प्रत्येक फोटोवर लाइक व कमेंट मोठ्या प्रमाणात येतात.नुकत्याच तिने इन्स्टाग्रामवर टाकलेल्या फोटोवर सुद्धा कमेंटचा पाऊस पडलाय.
First published:

Tags: Alia Bhatt, Arjun kapoor

पुढील बातम्या