नवी दिल्ली, 28 मार्च: लग्नानंतर अभिनेत्री दीया मिर्झा (Dia Mirza) मालदीवला हनिमून ट्रीपवर आहे. या ठिकाणचे फोटो आणि अपडेट्स दीया सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांशी शेअर करत आहे. दीयाची सावत्र मुलगी समायराही या ट्रीपला सोबत गेली आहे. दीया आणि समायराची या ट्रीपमध्ये चांगली गट्टीही जमल्याचं दिसत आहे. दीयाने नुकतंच सावत्र मुलीसह काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. समायरासोबत दीया पोहताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो पती वैभव रेखी (Vaibhav Rekhi) यांनी काढला आहे.
काही दिवसांपूर्वी दीयाने फोटो शेअर केले होते. तिच्या फोटोला चाहत्यांची चांगली पसंतीही मिळाली होती. त्या फोटोत दीया हिरव्या रंगाच्या बिकनीत शिअर फॅब्रिक श्रग घालून समुद्रकिनारी पोज देताना दिसली होती. ‘आम्ही स्वर्गात असल्यासारखा अनुभव घेत आहोत. खूप मजा येत आहे. आतापर्यंत इथे घालवलेला वेळ मजेशीर गेला आहे. हा फोटो त्यांनी काढला आहे’ असं कॅप्शन तिने फोटोला दिलं होतं.
(वाचा - पतीला divorce देऊन चित्रांगदा राहतेय बॉबी देओलच्या घरात ) दीया मिर्झा आणि उद्योगपती वैभव रेखी हे दोघे 15 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकले आहेत. दीया आणि वैभव या दोघांचं हे दूसरं लग्न आहे. दीयाचा पहिला विवाह साहिल संघा यांच्यासोबत झाला होता. दोघांनी 11 वर्षे एकत्र संसार केल्यानंतर 2019 मध्ये त्यांचे मार्ग वेगळे झाले. सोशल मीडियावर याबाबत दीयाने माहिती दिली होती. एकमेकांच्या संमतीने ज्वॉइंट स्टेटमेंटवर स्वाक्षरीसह याची घोषणा केली होती. ‘11 वर्षे संसार केल्यानंतर आम्ही दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही चांगले मित्र आहोत आणि पुढेही आमची मैत्री कायम राहील. प्रेम आणि सन्मानासह आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही कायम एकमेकांचे आभारी असू’ असं या दोघांनी वेगळं होताना म्हटलं होतं.