मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Anupam Kirron Kher Love Story: एकमेकांचे Best Friend असूनही दुसऱ्यांशीच केलं लग्न; मूल झाल्यावर कळलं पहिलं प्रेम

Anupam Kirron Kher Love Story: एकमेकांचे Best Friend असूनही दुसऱ्यांशीच केलं लग्न; मूल झाल्यावर कळलं पहिलं प्रेम

Anupam Kirron Kher Love Story: एकमेकांचे Best Friend असूनही दुसऱ्यांशीच केलं लग्न; मूल झाल्यावर कळलं पहिलं प्रेम

Anupam Kirron Kher Love Story: एकमेकांचे Best Friend असूनही दुसऱ्यांशीच केलं लग्न; मूल झाल्यावर कळलं पहिलं प्रेम

प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर 1985 मध्ये विवाहबद्ध झाले. किरण यांचा हा दुसरा विवाह होता. किरण यांचा गौतम बेरी (Gautam Berry) यांच्याशी पहिला विवाह झाला होता. वाचा किरण खेर आणि अनुपम खेर यांची लव्ह स्टोरी

मुंबई, 14 जून: बॉलिवूडमधल्या कपल्सचं (Bollywood Couples) खासगी आयुष्य कसं असतं, त्यांनाही सर्वसामान्य माणसांप्रमाणे प्रश्न पडतात का, असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. अलीकडच्या काळात सोशल मीडियामुळे यातल्या काही प्रश्नांची उत्तरं फॅन्सना मिळू लागली आहेत. बॉलिवूडमधल्या काही कपल्सचं खासगी आयुष्यदेखील वादळी होतं, हे आपण अनेकदा वाचलेलं, ऐकलेलं आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) आणि किरण खेर (Kirron Kher) हे स्टार कपल त्यापैकीच एक होय. वैविध्यपूर्ण भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणाऱ्या अनुपम खेर यांना खासगी आणि कौटुंबिक आयुष्यात अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. नुकताच किरण खेर यांनी त्यांच्या विवाहाविषयी आणि वैवाहिक जीवनाविषयी (Married Life) अनेक गोष्टींचा खुलासा केला. अनुपम खेर यांच्यासोबत लग्न करण्यासाठी किरण यांनी पहिल्या पतीला घटस्फोट (Divorce) दिला होता. ती वेळ अशी होती, की अनुपम खेर यांची आर्थिक स्थिती नाजूक होती; पण तरीही किरण यांनी आपला निर्णय बदलला नाही. `इंडियन एक्सप्रेस`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे. प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर आणि किरण खेर 1985 मध्ये विवाहबद्ध झाले. किरण यांचा हा दुसरा विवाह होता. किरण यांचा गौतम बेरी (Gautam Berry) यांच्याशी पहिला विवाह झाला होता. गौतम यांच्यापासून किरण यांना सिकंदर हा मुलगा आहे. किरण यांनी गौतम बेरींसोबत घटस्फोट घेतला आणि त्या अनुपम खेर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्या. अनुपम आणि किरण यांनी 36 वर्षांच्या वैवाहिक जीवनात अनेक वादळी प्रसंगांना तोंड दिलं. प्रत्येक प्रसंगाचा अत्यंत ताकदीनं सामना केल्यानं आमचं मनोबल अधिक वाढल्याचं किरण सांगतात. कोरोना काळात किरण यांना कर्करोगाचं (Cancer) निदान झालं. अशा कठीण प्रसंगातही त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. अत्यंत खडतर लढा देऊन त्यांनी कर्करोगावरही विजय मिळवला. हेही वाचा - Ananya Marathi movie: महाराष्ट्राच्या क्रशची पहिली झलक, 'अनन्या'चा टीजर झाला प्रदर्शित 2013 मध्ये किरण खेर यांनी फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांच्या लव्हस्टोरीविषयी सांगितलं होतं. `मी आणि अनुपम चंडीगडमध्ये नाट्यक्षेत्रात (Theater) होतो. त्या वेळी आम्ही चांगले मित्र होतो. त्याला माझ्याबद्दल माहिती नाही, अशी कोणतीच गोष्ट नव्हती आणि मलादेखील त्याविषयी सर्व काही माहिती होतं. अगदी तो कोणत्या मुलीला पटवण्याच्या विचारात आहे, हेदेखील मला माहिती असायचं. ते दिवस खूप मजेदार होते आणि आम्ही एकत्र चांगलं काम केलं; पण आमच्यामध्ये मैत्रीपलीकडे कोणत्याही प्रकारचं आकर्षण नव्हतं,` असं किरण यांनी या मुलाखतीत सांगितलं होतं. `मी मुंबईत आले आणि गौतम बेरी यांच्यासोबत माझा विवाह झाला. आमच्या वैवाहिक जीवनात सारं काही आलबेल नव्हतं आणि नेमक्या त्याच वेळी अनुपम खेर यांच्याही वैवाहिक जीवनात काही अडचणी होत्या. त्या वेळीदेखील तो आणि मी चांगले मित्र होतो आणि एकत्र नाटकांमध्ये काम करत होतो. मला आठवतं, आम्ही नदिरा बब्बर यांच्या नाटकासाठी कोलकत्याला जात होतो. त्या वेळी त्याचा लूक काहीसा बदलला होता. एका चित्रपटासाठी त्यानं मुंडण केलं होतं. त्यामुळे तो वेगळाच दिसत होता. त्या वेळी खोलीतून बाहेर पडताना त्यानं माझ्याकडं वळून पाहिलं आणि आमच्यात काही तरी घडल्यासारखं वाटलं. काही वेळानंतर तो आला आणि त्यानं माझ्या खोलीचा दरवाजा ठोठावला आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे. मला वाटतं मी तुझ्या प्रेमात पडलोय, असं तेव्हा तो म्हणाला. त्या वेळी अचानक काहीतरी मोठा बदल झाला आणि आमचं नातं उलगडलं असं जाणवलं. त्यानंतर मी घटस्फोट घेतला आणि अनुपमशी लग्न केलं; पण त्या वेळी त्याच्याकडं काहीच नव्हतं,` असं किरण खेर यांनी सांगितलं. हेही वाचा - TRP साठी वाटेल ते...! वटपौर्णिमेला बायकोला उचलून घेण्याता मालिकेच्या हिरोची लागेलय रेस `तथापि, लग्नानंतर दोन वर्षांनी, अनुपम यांनी निर्मिती क्षेत्रात (Production) उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु, यामुळे आम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. वेळप्रसंगी इंडस्ट्रीतल्या लोकांकडून पैसे घ्यावे लागले. या टप्प्यावर मी पुन्हा कामं करण्याचा आणि पतीला आधार देण्याचा निर्णय घेतला. तो कालावधी आमच्यासाठी भयानक होता. अनुपमने एंटरटेनमेंट कंपनी सुरू केली होती. टीव्हीसाठी तो निर्मिती करणार होता; पण मी त्याला तसं न करण्याचा सल्ला देत होते; मात्र तो बराच पुढे गेला होता. एकाचवेळी अनेक शोज करण्यासाठी त्यानं खूप कर्ज घेतलं होतं आणि हे सत्य त्यानं माझ्यापासून लपवून ठेवलं होतं. त्यानंतर कोणतीही पूर्वसूचना न देता एका महिन्यात त्याचे आठ शो ऑफ एअर (Off Air) झाले. टीव्ही चॅनेलचे बॉस बदलले आणि कित्येक महिने पैसे अडकून पडले. त्यामुळे आम्ही आर्थिक संकटात सापडलो. याच दरम्यान त्याचं करिअर उतरणीला लागलं. अत्यंत वाईट विनोदी भूमिकांमध्ये त्याला टाइपकास्ट केलं जात होतं. ही सर्व परिस्थिती अनुपमने सकारात्मकतेनं हाताळली. तो आशावादी असल्याचं मला जाणवलं,` असं किरण यांनी सांगितलं. `देवदास हा माझा पहिला व्यावसायिक चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला; मात्र त्यावर अनुपमची प्रतिक्रिया पाहण्यासारखी होती,` असं किरण यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, `मला त्याच्यापेक्षा जास्त पैसे मिळत होते आणि तो मला किती पैसे मिळाले हे विचारत अनेकदा माझ्यावर विनोद करायचा. त्याची लोकप्रिय होण्यासाठीची संधी हुकल्यानं तो माझ्या कामाबद्दल विनोद करत होता,` असं किरण यांनी सांगितलं. `पण तो कठीण काळातून जात होता आणि कोणत्याही मोठ्या बॅनरसोबत काम करत नव्हता. म्हणून ही माझ्या यशाबद्दल त्याची प्रतिक्रिया होती, हे मला नंतर समजलं. तो बऱ्याचदा बॅड पॅचमध्ये गेला; पण त्याने स्वतःच प्रश्नांचं निराकरण केलं,` असं किरण सांगतात. `मध्यंतरीची तीन-चार वर्षं खूप वाईट होती; पण त्यानं मला मजबूत बनवलं. मला स्वतःसोबत जगायला शिकवलं, एकटा प्रवास करायला शिकवलं. खूप वेदना होत होत्या, पण सुदैवानं मी सगळ्यातून बाहेर पडले,` असं किरण यांनी स्पष्ट केलं.
First published:

Tags: Anupam kher, Bollywood, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News

पुढील बातम्या