मुंबई, 22 फेब्रुवारी- बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने नुकतेच तिचे खाजगी फोटो एका पोर्टलने पोस्ट केल्यानंतर नाराजी व्यक्त केली होती. आलियानं तिच्या इन्स्टा स्टोरीवर त्या पोर्टलला टॅग करत खरं खोट सुनावलं होतं. आता मात्र हद्द झाली आहे. आलिया घराच्या बालकनीत म्हणजे खिडकीजवळ बसून आराम करत होती. त्यावेळी एका फोटोग्राफरने तिचे काही फोटो क्लिक केले.
वाचा-ह्रता दुर्गुळे लवकरच करणार मोठी घोषणा, सोशल मीडिया पोस्ट करत दिली माहिती
फोटोग्राफच्या याा कृतीनंतर आलियाला राग आला व तिनं फोटोग्राफरला आणि पोर्टलला त्यांच्या सीमांची आठवण करत खडसावलं. शिवाय तिनं तिची ही पोस्ट मुंबई पोलिसांना टॅग केली. आलियाच्या या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला आणि तिला एका फोटोग्राफरने तिचे खाजगी फोटो क्लिक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यास सांगितले. हे फोटो ऑनलाइन पोर्टलवर प्रकाशित झाले आहेत. आलिया भट्टने पोलिसांना सांगितले आहे की, तिची पीआर टीम संबंधित पोर्टलच्या संपर्कात आहे.
Mumbai Police has contacted actor Alia Bhatt&asked her to file a complaint in the matter where a photographer clicked her private pictures&these pictures were published on an online portal. The actor has told police that her PR team is in touch with the concerned portal: Police
— ANI (@ANI) February 22, 2023
काय म्हटलं होतं आलियानं तिच्या पोस्टमध्ये?
आलिया भट्टने इन्स्टा स्टोरीमधील आपला एक फोटो शेअर केला होता, जो पापाराझीने घेतला आहे. ज्यामध्ये ती तिच्या लिव्हिंग रुमध्ये आराम करताना दिसते. या फोटोसोबत अभिनेत्रीने लिहिले की, नेहमीप्रमाणे मी दुपारी माझ्या घरी लिव्हिंग रुममध्ये विश्रांती घेत होते. तेवढ्यात मला असं वाटलं की कोणीतरी मला बघतंय. मी वर पाहिलं तर शेजारच्या इमारतीच्या छतावर कॅमेरे घेऊन दोन लोक दिसले.
एखाद्याचे असे फोटो घेणे कितपत योग्या आहे? असा सवाल आलियाने केला आहे. गोपनीयतेचे उल्लंघन करण्याची हद्द झाली. तुम्ही तुमच्या मर्यादा ओलांडू शकत नाही. पण तुम्ही तुमची मर्यादा ओलांडली, असंच म्हणावं लागेल, असंही आलियाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. आलिया भट्टनंतर, अनुष्का शर्मा आणि जान्हवी कपूर यांनीही त्यांचे अनुभव शेअर केले आहेत आणि हे गोपनीयतेचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Alia Bhatt, Bollywood, Bollywood News, Entertainment, Mumbai Poilce