मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ट्रोल होताच आलिया भट्टनं सुरु केलं Social work; रुग्णांना अशी करतेय मदत

ट्रोल होताच आलिया भट्टनं सुरु केलं Social work; रुग्णांना अशी करतेय मदत

आलिया भट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेस रोलरला महत्त्व देते.

आलिया भट आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये फेस रोलरला महत्त्व देते.

(Alia Bhatt )आलिया नुकताच मालदीवहून परतली आहे. परत आल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आलं होतं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 1 मे-  कोरोना विळखा(Coronavirus)  दिवसेंदिवस वाढत चालला आहे. रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होतं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कडक लॉकडाऊनचा(Maharashtra Lockdown)  पर्याय देखील अवलंबण्यात आला आहे. तसेच देशाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. लोकांना मोठ्या प्रमाणात मदतीची गरज पडत आहे. अशामध्ये अनेक बॉलीवूड कलाकार(Bollywood Stars)  मदतीसाठी धाव घेत आहेत. सोनू सूद (Sonu Sood) पासून ते अजय देवगनपर्यंत (Ajay Devgn)अनेक कलाकारांनी अमुल्य मदत केली आहे. तर दुसरीकडे काही कलाकार मालदीवला सुट्टीला (Maldive Vacation) गेल्यामुळे ट्रोल होतं होते. त्यातीलचं एक म्हणजे आलिया भट्ट(Alia Bhatt). आलिया नुकताच मालदीवहून परतली आहे. परत आल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणत ट्रोल करण्यात आलं होतं. देशात कोरोनामळे परिस्थिती हलाखीची झाली असताना हे लोक बाहेर जाऊन पैसा उधळत आहेत, म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र ट्रोल झाल्यानंतर आत्ता आलियानेसुद्धा मदतीसाठी धाव घेतली आहे.

आलियाने नुकताच कोरोनाला मात दिली आहे. त्यामुळे तिलासुद्धा कोरोनाची स्थिती चांगल्या प्रकारे समजत आहे. त्यामुळे तिने सामाजिक कार्यास सुरुवात केली आहे. आलिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत कोणत्या नं कोणत्या गोष्टी शेयर करत असते. नुकताच आलियाने आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तिने महाराष्ट्र ते पंजाबपर्यंतच्या 8 जागेचे हेल्पलाईन नंबर शेयर केले आहेत. तसेच एका खाजगी संस्थेचा सुद्धा नंबर शेयर केला आहे.

आलियाने पत्रकार फेय डिसूझा सोबत मिळून कोरोनासंबंधीची माहिती जमा करून लोकांपर्यंत पोहचविण्याची योजना तयार केली आहे. ज्यामुळे लोकांना उपचारासाठी मदत होऊ शकेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ती विविध राज्यांच्या हेल्पलाईन नंबर्सना सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

(हे वाचा: प्रिया मराठेनं कोरोना रुग्णांना दिली प्रेरणा; Videoवर होतोय कौतुकाचा वर्षाव )

तसेच आलियानं म्हटलं आहे, ‘ ही वेळ अनेक अनिश्चित गोष्टींची आहे, यावेळी लोकांना योग्य माहितीची आवश्यकता आहे. तयमुले जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहचविली पाहिजे. माहितेय सध्या वेळ कमी आहे. मात्र जितकी होईल तितकी प्राथमिक माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे’.

(हे वाचा: अभिनेता कोरोना रुग्णांसाठी झाला ड्रायव्हर; अ‍ॅम्ब्युलन्स चालवुन करतोय मदत )

सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. आणि यामध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे देशाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. देशात सध्या एक करोड़ 91 लाख 64 हजार 969 इतकी रुग्णसंख्या झालेली आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Bollywood actress, Corona, Coronavirus, Instagram post, Marathi entertainment, Photo viral