मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रिया मराठेनं कोरोना रुग्णांना दिली प्रेरणा; Videoवर होतोय कौतुकाचा वर्षाव

प्रिया मराठेनं कोरोना रुग्णांना दिली प्रेरणा; Videoवर होतोय कौतुकाचा वर्षाव

छत्रपती शिवाजी महराजांच्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीनं दिला खास संदेश; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

छत्रपती शिवाजी महराजांच्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीनं दिला खास संदेश; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

छत्रपती शिवाजी महराजांच्या मालिकेत काम करणाऱ्या अभिनेत्रीनं दिला खास संदेश; व्हिडीओवर होतोय कौतुकाचा वर्षाव

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 1 मे: कोरोनामुळं (corona pandemic) सर्वत्र निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. कुटुंबातील सदस्य मृत्यूमुखी पडल्यामुळं अनेकांचं जीवन उध्वस्त झालं आहे. शिवाय देशभरातील रुग्णालयांत हजारो लोक दररोज मृत्यूशी दोन हात करताना दिसत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत देशवासीयांना प्रोत्साहन देण्यासाठी मराठी अभिनेत्री प्रिया मराठे (Priya Marathe) हिनं एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तिच्यावर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रिया सध्या स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत रायबागण ही व्यक्तिरेखा साकारत आहे. ही मालिका छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमावर आधारित आहे. या मालिकेतील एक फाईट सीन प्रियानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला. अन् या व्हिडीओद्वारे तिनं रुग्णांना कोरोनाविरोधात लढण्याची प्रेकरणा दिली. “आपण सर्वच जण या कोरोनाविरोधात दमदार लढा देतोय…आणि यात आपण जिंकलोय…हे यश वास्तविकतेकडे ही वळवणं शक्य आहे… यासाठी आपल्या सर्वांना खूप शक्ती मिळो…! शिवाय ज्यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, ते लवकरात लवकर यातून बाहेर पडू दे ” अशा आशयाचा संदेश तिनं दिलं आहे. तिच्या व्हिडीओवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सुपरस्टार अभिनेता कोरोना रुग्णांसाठी झाला ड्रायव्हर; अ‍ॅम्ब्युलन्स चालवुन करतोय मदत

भारतात रुग्णसंख्येचा विस्फोट

24 तासांत 4 लाखांहून जास्त कोरोना रुग्ण सापडलेला भारत हा जगातला पहिलाच देश ठरला आहे. या आकडेवारीमुळे एक नकोसा विक्रम भारताच्या नावावर आला आहे. त्यामुळे देशातल्या कोरोनाबाधितांची आत्तापर्यंतची एकूण संख्या आता 1 कोटी 91 लाख 64 हजार 969 इतकी झाली आहे. यासोबतच गेल्या 24 तासांमध्ये देशात 3 हजार 523 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे देशाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोरदार तडाखा बसल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress