Home /News /entertainment /

सुपरस्टार अभिनेता कोरोना रुग्णांसाठी झाला ड्रायव्हर; अ‍ॅम्ब्युलन्स चालवुन करतोय मदत

सुपरस्टार अभिनेता कोरोना रुग्णांसाठी झाला ड्रायव्हर; अ‍ॅम्ब्युलन्स चालवुन करतोय मदत

सोनू सूदचा आदर्श घेऊन बॉलिवूडमधले अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी आपल्याला शक्य ती मदत केली आहे. कन्नड सिनेमांमधला (Kannada Actor) अभिनेता अर्जुन गौडानेही (Arjun Gowda) या काळात मोठं मदतकार्य केलं आहे.

  मुंबई 1 मे: कोरोनामुळे (Corona) सध्या अभूतपूर्व परिस्थिती ओढवली आहे. बहुतांश नागरिक दुःखात आहेत. कुणाला संसर्ग झालाय म्हणून, तर कुणाला संसर्ग होण्याची भीती आहे म्हणून. कोणाला लॉकडाउनमुळे (Lockdown) सक्तीने घरात बसण्याचा कंटाळा येतोय, तर काही जणांना हातावर पोट असल्यामुळे इच्छा असूनही घरी बसता येत नाहीये म्हणून काळजीत आहेत. कोणाकडे पैसे आहेत, पण बेड किंवा अन्य वैद्यकीय सुविधा मिळत नाहीयेत, म्हणून ते चिंतेत आहेत. रोजच्या खाण्याचीच भ्रांत असलेल्यांचे तर हाल फारच वाईट आहेत; मात्र अशा स्थितीत अनेक परोपकारी व्यक्ती, सामाजिक संस्था आपापल्या परीने शक्य तेवढी आणि शक्य त्या प्रकारची मदत करत आहेत. पडद्यावर प्रामुख्याने खलनायक रंगवणाऱ्या अभिनेता सोनू सूदने कोरोना काळात आपल्या खऱ्या आयुष्यात किती व्यापक मदतकार्य केलं आहे, याबद्दल आपण ऐकलं, वाचलं, पाहिलं आहेच. सोनू सूदचा आदर्श घेऊन बॉलिवूडमधले अनेक अभिनेते-अभिनेत्रींनी आपल्याला शक्य ती मदत केली आहे. कन्नड सिनेमांमधला (Kannada Actor) अभिनेता अर्जुन गौडानेही (Arjun Gowda) या काळात मोठं मदतकार्य केलं आहे. सर्टिफाइड न्यूट्रिशनिस्ट असलेला अर्जुन कोविड रुग्णांसाठी अॅम्ब्युलन्स ड्रायव्हर (Ambulance Driver) बनला आहे. 'दैनिक भास्कर'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. अच्छा तो हम चलते हैं…; लॉकडाऊनला वैतागून अभिनेत्रीनं सोडला महाराष्ट्र अर्जुन गौडाने कोरोना काळातल्या मदतकार्यासाठी 'स्माइल केअर फॉर ऑल' (Smile Care for All) या नावाने प्रकल्प सुरू केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन हे काम करत असून, आतापर्यंत त्याने जवळपास सहा कोरोनाबाधित मृतांवर अंत्यसंस्काराचं पवित्र कार्यही केलं आहे. आपण हे काम करत असताना आवश्यक ती सगळी काळजी घेत असल्याचं अर्जुनने सोशल मीडियावरच्या पोस्टमध्ये शेअर केलं आहे. त्याने यासाठीचं खास प्रशिक्षणही घेतलं आहे. 'कर्नाटकातल्या लोकांची सेवा आणि त्यांच्यासाठी काम करणं ही माझी जबाबदारी आहे, तसंच माझ्यासाठी ती सन्मानाची बाब आहे,' अशी भावना अर्जुनने व्यक्त केली आहे. प्रसिद्ध अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं कोरोनानं निधन, 52 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास शुक्रवारी (30 एप्रिल) अर्जुनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली असून, त्यात तो एका कोरोनाबाधिताच्या मृतदेहासोबत उभा असल्याचं दिसत आहे. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तो जात आहे.
  'अंत्यसंस्कार... न पुण्यम् न पापम् न सौख्यम् न दुःखम् न मंत्रो न तीर्थम् न वेदः न यज्ञ: अहम् भोजनम् नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूप: शिवोहम् शिवोहम्।' अशा ओळी अर्जुनने या फोटोसोबत लिहिल्या आहेत. अंत्यसंस्काराचं काम पुण्याचं असल्याचं भारतीय संस्कृती मानते. त्यात कोरोनाच्या काळात तर हे कार्य अधिकच जोखमीचं नि तितकंच महत्त्वाचं झालं आहे. त्यामुळे असं कार्य करण्यासाठी स्वेच्छेने तयार झालेल्या या अभिनेत्याचं चाहत्यांकडून कौतुक होत आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Bollywood actor, Covid cases, Marathi entertainment

  पुढील बातम्या