जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची 'Man Zal Bajind' च्या चित्रीकरण स्थळी सदिच्छा भेट

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची 'Man Zal Bajind' च्या चित्रीकरण स्थळी सदिच्छा भेट

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांची 'Man Zal Bajind' च्या चित्रीकरण स्थळी सदिच्छा भेट

झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ (Man Zal Bajind) प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. नुकतीच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी भेट दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 नोव्हेंबर : झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका ‘मन झालं बाजिंद’ (Man Zal Bajind) प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे.सालस कृष्णा आणि रांगडा राया प्रेक्षकांना भावले आहेत. नुकतीच महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी भेट दिली आहे. झी मराठीने त्याच्या इन्स्टा पोस्टवर काही फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी वाई येथे झी मराठी वाहिनीवरील मन झालं बाजिंद या मालिकेच्या चित्रीकरण स्थळी सदिच्छा भेट दिली. वाचा : Aryan khan च्या सुरक्षिततेसाठी Shahrukh Khan चा मोठा निर्णय; ‘या’ व्यक्तीकडे… मालिकेचे निर्माते तेजपाल वाघ, दिग्दर्शक अनिकेत साने व प्रमुख कलाकार कृष्णा (श्वेता खरात), राया ( वैभव चव्हाण ), मामी ( बिना कालेकर ) यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजयसिंह मोहिते पाटील यांनी संपूर्ण टीमशी संवाद साधला. सर्व कलाकारांचे व टीमचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.

जाहिरात

अभिनेत्री श्वेता खरात (Shweta Kharat) आणि अभिनेता वैभव चव्हाण (Vaibhav Chavan) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. श्वेता याआधी ‘राजा राणी ची ग जोडी’ या कलर्स मराठी वाहिनी वरील मालिकेत सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसली होती. तर आधीही तिने अनेक मालिकांमध्ये लहान भूमिका साकारल्या होत्या. तर मन झालं बाजिंद या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसत आहे. अभिनयासोबतच ती उत्तम डान्सरही आहे. सोशल मीडिया वर तिचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात.अभिनेता नितीश चव्हाण सोबत (Nitish Chavan) तिची डान्स केमिस्ट्री मागील काही दिवसांपासून चांगलीच हीट ठरली होती . ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याचंही म्हटलं जातं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात