Home /News /entertainment /

कोरोनाचा फटका बॉलिवूडला; लॉकडाउनमुळं 15 दिवस शूटिंग राहणार बंद

कोरोनाचा फटका बॉलिवूडला; लॉकडाउनमुळं 15 दिवस शूटिंग राहणार बंद

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (maharashtra CM)उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच अंतर्गत आता चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण सुद्धा बंद(shoot ban) करण्याचे आदेश दिले आहेत.

    मुंबई, 14एप्रिल- गेली वर्षभर कोरोनाची महामारी(corona) सुरु आहे. मध्यंतरी ही स्थिती सुधारून सामान्य जनजीवन सुरळीत होतं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा कहर वाढला आहे. ही कोरोनाची दुसरी लाट असल्याचं म्हटलं जातं आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोना रुग्णांची संख्या महाराष्ट्रात(maharashtra) जास्त आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने योग्य ती खबरदारी घेत कोरोनाची ही साखळी तोडण्याचा (break the chain)निश्चय केला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (maharashtra CM)उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. याच अंतर्गत आता चित्रपट, मालिका आणि जाहिरातींचे चित्रीकरण सुद्धा बंद(shoot ban) करण्याचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची चिघळत चाललेली परिस्थिती पाहून मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. येत्या 15 दिवस राज्यामध्ये लॉकडाऊन असणार आहे. अत्यावश्यक सुविधा वगळता सर्व काही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘ब्रेक द चेन’ असा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना सहकार्य करण्यास सांगण्यात आलं आहे. या महामारीमध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कमीत कमी 15 दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे 15 दिवसांचा बंद ठेवण्यात येणार आहे. सर्व नागरिकांना पुन्हा एकदा घरी बसून सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडून ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार आज रात्री 8 पासून ते 1 मे सकाळी 7 पर्यंत हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामध्ये कोणतकोणत्या अत्यवश्यक सेवा चालू राहणार यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. आणि त्यात चित्रिकरणाचं नाव नाहीय. त्यामुळे सर्व चित्रपट, मालिका आणि जाहिरातींना आपलं चित्रीकरण 15 दिवसांसाठी थांबवावं लागणार आहे. त्यामुळे सर्वच निर्मात्यांना करोडोंचा फटका सहन करावा लागणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे येत्या 15 दिवस चित्रपटगृहे बंद राहणार आहेत. त्यामुळे येत्या 2 आठवड्यांत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांवर ग्रहण लागलं आहे. ‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लोयीज’ चे अध्यक्ष बी.एन.तिवारी यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारचा हा निर्णय आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यामुळे आमच्या नियमित कर्मचाऱ्यांच मोठं नुकसान होणार आहे. (हे वाचा: सुबोध भावेची चाहत्यांना गुढीपाडव्याची संगीतमय भेट; शेअर केला VIDEO) तिवारी यांनी म्हटलं आहे सध्या मुंबई मध्ये चित्रपट आणि मालिका मिळून 100 चित्रीकरण चालू आहेत. आणि काही मोठ्या चित्रिकरणानां प्रतीक्षेत ठेवण्यात आलं आहे. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. गेल्या वर्षीच्या काही अहवालानुसार लॉकडाऊन मध्ये चित्रपटसृष्टीला तब्बल 8 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood, Corona updates

    पुढील बातम्या