मुंबई, 06 ऑक्टोबर: बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा (Malaika Arora)ला नुकताच कोरोना झाला होता. त्यामुळे तिने स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतलं होतं. आनंदाची बातमी अशी की मलाईका आता कोरोनातून बरी झाली आहे. मलायकाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ती इंडियाज् बेस्ट डान्सर्स (India’s Best Dancer) या शोसाठी तयार होत होती. फॅशन स्टायलिस्ट मनेका सिंघानीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यात मलायका अतिशय देखणी दिसत आहे. कोरोनातून बरी झाल्यानंतर मलायका सलॉनमध्ये गेली होती. तिच्या घराजवळच असलेल्या सलॉनमध्ये मलायका आपल्या केसांची ट्रिटमेंट करायला गेली होती. तिचा सलॉनमधला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नुकतीच कोरोनातून बरी झाल्यावर सलॉनमध्ये गेल्यामुळे तिच्यावर नेटकऱ्यांना चांगलीच टीका केली होती. कोरोनातून बरं झाल्यावर घरीच राहायचं सोडून घराबाहेर का पडलीस अशा प्रश्नांची सरबत्ती नेटकऱ्यांनी तिच्यावर केली आहे.
बॉयफ्रेंड अर्जुन कपूरपाठोपाठ मलायकाला कोरोनाची लागण झाली होती. 6 सप्टेंबरला तिला कोरोनाचं निदान झालं होतं. 7 सप्टेंबरला तिनं आपल्या इन्स्टाग्रामवर आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. मलायका अरोराचा शो ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’च्या सेटवर 7 ते 8 जण कोरोना संक्रमित झाले होते, त्यानंतर मलायकाचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मलायकामध्ये लक्षणं दिसत नव्हती. त्यामुळे ती होम क्वारंटाईन होती. घरीच तिच्यावर उपचार सुरू होते.