मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

जेनेलिया नव्हे तर 'हे' आहे माझ्या बायकोचं नाव; रितेशने केला खुलासा

जेनेलिया नव्हे तर 'हे' आहे माझ्या बायकोचं नाव; रितेशने केला खुलासा

 रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) ही बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखलं जातं.

रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) ही बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखलं जातं.

रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) ही बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखलं जातं.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 5 ऑगस्ट- रितेश देशमुख(Riteish Deshmukh) आणि जिनिलिया (Genelia Deshmukh) हे बॉलिवूडमधील सर्वात क्युट कपल म्हणून ओळखलं जातं. या दोघांनी आपल्या पाहिल्याचं चित्रपटात एकत्र काम केल होतं. आणि त्यांनतर त्यांच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. लग्नानंतरही या दोघांचं प्रेम तसचं आहे. हे दोघेही एकमेकांसोबत खुपचं खुश असतात. आज जिनिलिया आपला वाढदिवस साजरा करत आहे. रितेशने खुपचं खास अंदाजात आज आपल्या पत्नीला विश केलं आहे. मात्र रितेशने नुकताच आपल्या पत्नीबद्दल केलेलं एक ट्वीट चर्चेत आलं आहे.

पत्नीच्या वाढदिवसाचं निमित्त साधत रितेशने एक ट्वीट केलं आहे. यामध्ये रितेशने म्हटलं आहे, ‘माझ्या बायकोचं नाव जिनिलिया आहे,..जेनेलिया नाही’. सोशल मीडियावर काही बरेच लोक जिनिलियाचं नाव जेनेलिया असं लिहितात. आणि म्हणूनचं ते दुरुस्त करण्याच्या उद्देशाने रितेशने हे ट्वीट केल आहे.

(हे वाचा: ...तर आमिर खान असता 'प्रेम'; 'हम आपके है कौन'ला 27 वर्षे पूर्ण!)

रितेशच्या या ट्वीट नंतर अनेक संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी म्हटलं आहे, ‘जेनेलिया असो किंवा जिनिलिया ती तुझी बायको आहे हेचं सत्य आहे’. ‘जेनेलिया म्हणा किंवा जिनिलिया शेवटी तीच तुझी बायको आहे’. तर काहींनी जिनिलियाच्या नावाचं गुगल ट्रान्सलेशन शेयर केल आहे. त्यामध्ये जेनेलिया आणि जिनिलिया दोन्ही शब्दांना गुगल सेमचं स्पेलिंग दाखवतं’. अशाप्रकारे रितेशच्या ट्वीटवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

(हे वाचा: ACP दिव्याने लावला बोल्डनेसचा तडका; 'चला हवा येऊ द्या'मध्ये करणार धम्माल)

तसेच रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर खास व्हिडीओ शेयर करत, पत्नी जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच अनेक कलाकारांनीसुद्धा कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. रितेश आणि जिनिलिया सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असतात. ते दररोज आपल्या चाहत्यांसाठी काही नं काही खास फोटो किंवा व्हिडीओ शेयर करत असतात.

First published:

Tags: Bollywood News, Riteish Deshmukh