• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Rajkummar Rao- Patralekhaचं ठरलं ! पारंपारिक पद्धतीने या ठिकाणी करणार लग्न, तयारीला सुरूवात

Rajkummar Rao- Patralekhaचं ठरलं ! पारंपारिक पद्धतीने या ठिकाणी करणार लग्न, तयारीला सुरूवात

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. राजकुमार राव लवकरच गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत (Patralekha) लग्नगाठ बांधणार आहे.

 • Share this:
  मुंबई, 8 नोव्हेंबर:  बॉलिवू़डमध्ये यंदा लगीनघाई जोरात दिसत आहे. कारण आता विकी कौशल-कतरिना कैफ आणि आलिया व रणबीर कपूर यांच्या लग्नाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता यानंतर बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. राजकुमार राव लवकरच गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत (Patralekha) लग्नगाठ बांधणार आहे. नोव्हेंबरमध्ये हे दोघ (Rajkummar Rao Patralekha Wedding) लग्नगाठ बांधणार आहे. ईटाइम्स दिलेल्या वृत्तानुसार, राजकुमार या वर्षी नोव्हेंबरमध्ये लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांचे लग्न 10, 11 आणि 12 नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे. आता लग्नाशी संबंधित काही अपडेट्स समोर आल्या आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा राजस्थानच्या जयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, एका सूत्राने सांगितले आहे की, “राजकुमार आणि पत्रलेखा जयपूरमध्ये पारंपारिक पद्धतीने लग्न करणार आहेत. लग्नाचे आमंत्रण देण्याचं काम सध्या सुरू आहे. लगनाची तयारी जोरात सुरू आहे. लग्नाला फक्त त्याच्या जवळचे लोकच उपस्थित राहतील. राजकुमार राव-पत्रलेखा गेल्या 10 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दरम्यान, त्यांच्या ब्रेकअपच्या अफवाही पसरल्या होत्या. वाचा : ‘बबड्या’ दिसणार आता नव्या भूमिकेत; इन्स्टा पोस्ट करत दिली माहिती 2018 मध्ये पत्रलेखाला तिच्या लग्नाबद्दल विचारण्यात आले होते, तेव्हा ती म्हणाली होती की, 'लग्नापूर्वी राजकुमार राव आणि तिला अनेक गोष्टींवर लक्ष काम करायचे आहे. त्यामुळे किमान 6-7 वर्ष तर असा कोणताही प्लॅन नाही.' मात्र आता दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. मिडिया रोपिर्टनुसार नोव्हेंबरच्या 10-11-12 या तारखेच्या दरम्यान लग्न होण्याची शक्यता आहे.
  दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे लव्हबर्ड्स एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करण्यास कधीच कमी पडत नाहीत. सोशल मीडियावरही राजकुमारने अनेकदा आपल्या लेडीलव्ह म्हणजे चित्रलेखाविषयी प्रेम व्यक्त केले आहे. दोघेही सोशल मीडियावर अनेकदा पोस्ट शेअर करताना आणि एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले आहेत. वाचा " कंगना,पी व्ही सिंधूसह 119 मान्यवरांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान राजकुमार आणि पत्रलेखाच्या लग्नाची चाहतेही बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. अशा परिस्थितीत आता त्यांच्या लग्नाची बातमी समोर येत आहे. तेव्हा या जोडप्याच्या लग्नाची बातमी चाहत्यांसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी नाही, असेच म्हणावे लागेल. जरी, राजकुमार त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबत कधीही चर्चा करत नसला. मात्र पत्रलेखावरील प्रेम व्यक्त करण्यास देखील तो मागे हटत नाही. राजकुमार राव सध्या क्रिती सेननसोबत त्याच्या आगामी 'हम दो हमारे दो' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दोघेही नुकतेच अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती'मध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी दिसले होते. यावेळी राजकुमार रावने त्याच्या दिवंगत आईची शेवटची इच्छा देखील व्यक्त केली होती. ज्याचा अमिताभ बच्चन यांच्याशी संबंध होता
  Published by:News18 Trending Desk
  First published: