मुंबई, 8 नोव्हेंबर: झी मराठी ‘अग्गंबाई सासूबाई.’ या मालिकेतील शुभ्रा आणि बबड्याची जोडी विशेष गाजली होती. शुभ्राची भूमिका अभिनेत्री तेजश्री प्रधानने तर बबड्याची भूमिका अभिनेता आशुतोष पत्कीने (ashutosh patki ) साकारली होती. या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. तरी देखील बबड्या आणि शुभ्रा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या मालिकेनंतर आशुतोष आता एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं याबद्दल माहिती दिली आहे.
आशुतोषने त्याच्या इन्स्टावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की,‘नमस्कार रसिक प्रेक्षकहो… दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या मुहूर्तावर मला तुम्हाला हे सांगायला आनंद होतोय की आज मी एका नवीन उपक्रमाची सुरुवात करतोय. आशुतोष पत्की एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुमच्यासाठी काहीतरी छान कंटेन्ट आणण्याचा प्रयत्न करणार आहे. ज्याचा “श्री गणेशा” दिवाळीच्या मुहूर्तावर होतोय.. तुमची साथ कायम असू द्या’ या आशयाची पोस्ट आशुतोषने केली आहे.
View this post on Instagram
आशुतोषने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केल्याचे या पोस्टमध्ये सांगितले आहे. त्याच्या यो पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. नवीन भूमिकेत पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. त्याच्या या नवीन प्रवासाला काही कलाकारांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा : ‘न भूतो न भविष्यति’, Bigg Boss Marathi च्या घरात आतापर्यंतचा सर्वात मोठा ट्विस्ट
आशुतोष पत्की ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा मुलगा असून त्याने वन्स मोअर या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पाऊल टाकले. अग्गंबाई सासूबाई मालिकेच्या आधी त्याने ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या मालिकेत काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने ओळख अग्गंबाई सासूबाई या मालिकेमुळे मिळाली. आशुतोष सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतात. त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी माहिती सोशल मीडियाच्या चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यासोबतचे विविध फोटो आणि व्हिडीओ देखील शेअर करत असतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial