• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • राजकुमार राव-पत्रलेखा उद्या बांधणार लग्नगाठ ; मेहंदी सोहळ्यासाठी हुमा कुरेशी पोहोचली

राजकुमार राव-पत्रलेखा उद्या बांधणार लग्नगाठ ; मेहंदी सोहळ्यासाठी हुमा कुरेशी पोहोचली

राजकुमार राव (Rajkumar Rao) गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत(Patralekha) 14 नोव्हेंबरला लग्नगाठ बांधणार आहे. पत्रलेखाची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) लग्नापूर्वीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आधीच पोहोचली आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर- राजकुमार राव (Rajkumar Rao) गर्लफ्रेंड पत्रलेखासोबत(Patralekha) लग्नगाठ बांधणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार 14 नोव्हेंबरल म्हणजे उद्या या दोघांचे लग्न होणार आहे. दोघांच्या घऱी जोरात लगीनघाई सुरू आहे. राजकुमार आणि पत्रलेखा यांचे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. लग्नात सहभागी होण्यासाठी कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी पोहोचली आहेत. बाकीचे पाहुणे लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमस्थळी पोहोचणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र पत्रलेखाची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी (Huma Qureshi) आधीच पोहोचली आहे. पत्रलेखाचा आज 13 नोव्हेंबरला मेहंदी सोहळा आहे. या खास सोहळ्यात कुटुंबासोबतच मित्रमंडळीही सहभागी होणार आहेत. अभिनेत्री हुमा कुरेशी पत्रलेखाच्या आयुष्यातील या खास प्रसंगाचा एक भाग होण्यासाठी पोहोचली आहे. टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, हुमा दोन दिवसांपूर्वीच तिच्या मैत्रिणीच्या लग्नाचे विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आधीच पोहोचली आहे. हुमा आपल्या कारमधून दिल्लीहून चंदीगडला गेली आहे. हुमा आणि पत्रलेखा या चांगल्या मैत्रिणी आहेत. अशा परिस्थितीत हुमाची मैत्रीण एका नव्या आयुष्याला सुरूवात करमार आहे. या क्षणाचा हुमाला देखील एक भाग व्हायचा आहे म्हणून ती दोन दिवस आधीच याठिकाणी पोहचली आहे. वाचा : अभिनेत्री ऐश्वर्या नारकर दिसणार हिंदी मालिकेत, साकारणार ऐतिहासिक भूमिका गेल्या 7 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर राजकुमार राव आणि पत्रलेखा या नात्याला एका सुंदर नात्याचं नाव देणार आहेत. राजकुमारने आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितले नसले तरी एकदा करण जोहरच्या 'कॉफी विथ करण' शोमध्ये सांगितले होते की, 'पत्रलेखा खूप मोकळ्या मनाची आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मला वाटते की तुमचा जोडीदार तुमचा सर्वात चांगला मित्र असतो तेव्हा खूप छान वाटते. तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवू शकता, नृत्य करू शकता, चित्रपट पाहू शकता. वाचा : ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेत अमोल कोल्हेंची मुलगी दिसणार राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचे लग्न 14 नोव्हेंबरला आहे. 13 नोव्हेंबरला मेहंदी सोहळा आहे. तीन दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्यात रविवारी विवाहानंतर सोमवारी विवाहोत्तर सोहळा होणार आहे. हुमा कुरेशी व्यतिरिक्त चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार यात सहभागी होणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: