मुंबई, 30 मे- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेता(Bollywood Actor) नसरुद्दिन शहा (Naseeruddin Shah) यांना मुंबईतील खारमध्ये असणाऱ्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना निमोनिया झाल्यानं रुग्णालयात दाखल केल्याचं सांगितलं जात आहे. नसरुद्दिन शहा गेल्या दोन दिवसांपासून या रुग्णालयात आहेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
रुग्णालयात त्यांच्या सोबत पत्नी रत्ना पाठक आणि मुलं आहेत. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार नसरुद्दिन शहा यांच्यावर उपचाराचा अनुकूल परिणाम दिसून येत आहे. त्यांच्या मॅनेजरने दिलेल्या माहितीनुसार त्यांना रुग्णालयात दाखल करणं आवश्यक होतं. मात्र सध्या त्यांच्या तब्येतीत सुधारणा होतं आहे.
(हे वाचा: दिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा खालावली; ICU मध्ये केलं दाखल)
नुकताच आज अभिनेत्री मंदिरा बेदीच्या पतीचं निधन झालं आहे. त्यामुळे बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशातच सोशल मीडियावर नसरुद्दिन शहा यांच्या निधनाची अफवादेखील उठली होती. मात्र ही फक्त अफवा आहे. अभिनेता नसरुद्दिन शहायांची तब्येत ठीक असल्याचं समजलं आहे.
(हे वाचा:मंदिरा आणि राजची लव्हस्टोरी होती अगदी फिल्मी; पहिल्याचं भेटीत घडलं होतं असं )
सध्या 70 वर्षांच्या असणाऱ्या अभिनेता नसरुद्दिन शहा यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. त्यांना थियेटर आणि चित्रपट अभिनेता म्हणून ओळखलं जातं. नसरुद्दिन शहा यांनी 1980 मध्ये आलेल्या ‘हम पांच’ या चित्रपटातून आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती. त्यांनी वो सात दिन, कर्मा, त्रिदेव, इजाजत इथपासून ते अलीकडच्या डर्टी पिक्चर, ईश्किया, अ वेन्सडे यांसारख्या चित्रपटांत दमदार भूमिका साकारत आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Naseeruddin shah