Home /News /entertainment /

बॉलीवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेता निघाला कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं स्वत:ला क्वारंटाईन

बॉलीवूड हादरलं! प्रसिद्ध अभिनेता निघाला कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं स्वत:ला क्वारंटाईन

लॉकडाऊनचा 4 था टप्पा सुरू असून देखील एकपाठोपाठ कोरोनाच्या केसेस समोर येत आहेत. त्यामुळे आता चिंता आणखीच वाढली आहे.

    मुंबई, 24 मे: देशात कोरोना व्हायरसचा (Coronavirus)दिवसेंदिवस वाढतच आहे. लॉकडाऊनचा 4 था टप्पा सुरू असून देखील एकपाठोपाठ कोरोनाच्या केसेस समोर येत आहेत. त्यामुळे आता चिंता आणखीच वाढली आहे. हेही वाचा...दिशा पाटनीने शेअर केला बिकिनी PHOTO,बोल्ड अंदाज पाहून फॅन्सनी केल्या या कमेंट्स बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभितेते किरण कुमार (Kiran Kumar) यांना कोरोनाची लागण झाली आहे. किरण कुमार यांनी स्वत: याबाबत खुलासा केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे किरण कुमार यांच्या कोरोनाचे कोणतेही लक्षणं दिसून आली नाहीत, तरी देखील त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. या प्रकारामुळे किरण कुमार यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. किरण कुमार सध्या 74 वर्षांचे असून त्यांना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. 'टाइम्स'च्या एका रिपोर्टनुसार, 14 मे रोजीच किरण कुमार यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाइन करुन घेतलं. 10 दिवसांपासून ते क्वारंटाइन असून त्यांची पुढील कोविड-19 टेस्ट 25 मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. किरण कुमार यांनी सांगितलं की, त्यांच्यात कोरोना व्हायरसचे कोणतेही लक्षणं नाहीत. तरी देखील रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. किरण कुमार यांना खोकला, ताप नाही तसेच त्यांना श्वसनाचीही त्रास नाही. किरण कुमार यांनी घराच्या दुसऱ्या फ्लोअरवर स्वत:ला आयसोलेट केले आहे. हेही वाचा..शिल्पा शेट्टीनं या कारणासाठी राज कुंद्राशी केलं लग्न, 11 वर्षांनी झाला खुलासा दरम्यान, किरण कुमार यांच्या आधी बॉलीवूडमध्ये अनेकाना कोरोनानाची लागण झाली आहे. सर्वात आधी सिंगर कनिका कपूर ही कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. त्यानंतर निर्माता करीम मोरानी आणि त्यांच्या दोन्ही मुली जोआ मोरानी, शाजिया मोरानी कोरोना संक्रमित आढळल्या होत्या. आता सगळे कोरोनामुक्त आहेत.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    पुढील बातम्या