शिल्पा शेट्टीनं या कारणासाठी राज कुंद्राशी केलं लग्न, 11 वर्षांनी झाला खुलासा, पाहा VIDEO

शिल्पा शेट्टीनं या कारणासाठी राज कुंद्राशी केलं लग्न, 11 वर्षांनी झाला खुलासा, पाहा VIDEO

शिल्पानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं राज कुंद्राशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. लॉकडाऊनच्या काळात शिल्पा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. सध्या ती तिच्या फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करताना दिसत आहे. ती नेहमीच सोशल मीडियावर तिच्या पती आणि मुलांसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. आताही शिल्पानं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं राज कुंद्राशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे.

शिल्पा शेट्टीनं तिच्या टिकटॉकवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात तिनं राज कुंद्राशी लग्न करण्याचं कारण सांगितलं आहे. या व्हिडीओमध्ये शिल्पाच्या नवऱ्याला ऑडिओ व्हॉइसवर प्रश्न विचारला जातो, तू लग्न का केलं. त्यावर तो उत्तर देतो हौस म्हणून. त्यानंतर हाच प्रश्न शिल्पाला विचारला जातो. त्यावर शिल्पा उत्तर देते याची हौस उतरवण्यासाठी. शिल्पा शेट्टीचं हे धम्माल उत्तर ऐकून तिचा नवरा कपाळावर हात मारून घेतो.

शिल्पा शेट्टीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं तर ती लवकरच 'हंगामा 2 ' आणि 'निकम्मा' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पण सध्या कोरोना व्हायरसच्या थैमानमुळे अनेक सिनेमाचं प्रदर्शन रखडलं आहे. त्यात शिल्पाचे हे दोन्ही सिनेमा अडकले आहे. मागच्या बऱ्याच वर्षांपासून दूर असलेली शिल्पा आता कमबॅकसाठी तयार झाली आहे. याशिवाय सध्याच्या लॉकडाऊनमध्ये ती तिचा सर्वाधिक वेळ मुलगी समीशासोबत स्पेंड करत आहे.

First published: May 24, 2020, 7:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading