दिशा पाटनीने शेअर केला बिकिनी PHOTO, बोल्ड अंदाज पाहून फॅन्सनी केल्या या कमेंट्स

दिशा पाटनीने शेअर केला बिकिनी PHOTO, बोल्ड अंदाज पाहून फॅन्सनी केल्या या कमेंट्स

लॉकडाऊनच्या काळात कलाकारांनी त्यांचे हॉलिडे स्पेशल फोटो पोस्ट करण्याचा जणू ट्रेंड बनला आहे. अभिनेत्री दिशा पाटनीने देखील समुद्रावरील असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

मुंबई, 22 मे : लॉकडाऊनच्या (Coronavirus Lockdown) काळात सुरक्षेच्या कारणासाठी सामान्य जनतेपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण घरातच वेळ घालवत आहेत. यादरम्यान बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय झाले आहे. सोशल मीडिया अकाऊंट्सच्या माध्यमातून ते त्यांच्या चाहत्यांशी जोडले जाण्याचा प्रयत्न करत आहेत. तर काही जण जुने फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात कलाकारांनी त्यांचे हॉलिडे स्पेशल फोटो पोस्ट करण्याचा जणू ट्रेंड बनला आहे. अभिनेत्री दिशा पाटनीने (Disha Patani) देखील समुद्रावरील असाच एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर यावर तिच्या चाहत्यांच्या कमेंट्स देखील वेगाने येत आहेत.

(हे वाचा-'क्रिश 4' मध्ये पुन्हा 'जादू' परत येण्याची शक्यता, स्वत: हृतिकने दिले संकेत)

दिशा सध्या तिचे सुट्टीचे दिवस आठवत असल्याचे या फोटोवरून दिसते. समुद्रकिनारी बसून बोल्ड अंदाजामध्ये तिन पोज दिली आहे. यामध्ये तिने फ्लॉरल बिकिनी घातली आहे. याआधीही तिचे काही बिकिनीतील फोटो व्हायरल झाले होते.

View this post on Instagram

 

🌸🌊

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

या फोटो शेअर करताना तिने कोणतं कॅप्शन दिलं नाही आहे पण फूल आणि समुद्राची इमोजी वापरून हा फोटो शेअर केला आहे. दरम्यान यावर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स केल्या आहेत

अनेक चाहत्यांनी दिशाच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत

अनेक चाहत्यांनी दिशाच्या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत

तिच्या एका चाहत्याने असे म्हटले आहे की 'हा फोटो टायगर श्रॉफने काढला आहे'. दिशा आणि टायगर अनेकदा सुट्टी एकत्र घालवताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे कदाचित या चाहत्याला असा प्रश्न पडला असावा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 23, 2020 10:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading