मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /ठरलं! सोनमची बहीण करणार लग्न; पाहा कोण आहे अनिल कपूरचा दुसरा जावई

ठरलं! सोनमची बहीण करणार लग्न; पाहा कोण आहे अनिल कपूरचा दुसरा जावई

अनिल कपूरची दुसरी मुलगी आणि सोनम कपूरची (Sonam Kapoor Sister) बहीण रिया कपूर(Rhea Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

अनिल कपूरची दुसरी मुलगी आणि सोनम कपूरची (Sonam Kapoor Sister) बहीण रिया कपूर(Rhea Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

अनिल कपूरची दुसरी मुलगी आणि सोनम कपूरची (Sonam Kapoor Sister) बहीण रिया कपूर(Rhea Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

मुंबई, 14 ऑगस्ट- बॉलिवूडमधून(Bollywood) एक आनंदाची बातमी समोर आली आहे. अभिनेता अनिल कपूरच्या(Anil Kapoor) घरी लवकरच सनईचौघडे वाजणार आहेत. अनिल कपूरची दुसरी मुलगी आणि सोनम कपूरची (Sonam Kapoor Sister) बहीण रिया कपूर(Rhea Kapoor) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. रिया कपूर खूप वर्षांपासून करण बुलानीला डेट करत आहे. हे दोघे तब्बल 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आणि आता हे दोघेही लग्नाच्याबेडीत अडकायला तयार झाले आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनिल कपूरच यांची मुलगी रिया कपूरच्या लग्नाचे कार्यक्रम 2 ते 3दिवस चालणार आहेत. यामध्ये काही मोजक्याच लोकांचा समावेश होणार आहे. कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम प्रायव्हेट पद्धतीने करण्यात येणार आहे. रिया कपूर आपला बॉयफ्रेंड करण बूलानीसोबत आपल्या जुहूमधील बंगल्यात लग्नबंधनात अडकणार आहे. यामध्ये कुटुंब,मित्रमैत्रिणीसोबत फक्त मोजकेच लोक उपस्थित असतील.

(हे वाचा: चल निघ!' भर रस्त्यात रणबीर कपूरवर भडकली होती प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री )

रिया-करणच्या लग्नात बॉलिवूडमधील काही लोकांचा समावेश होऊ शकतो. कोरोनामुळे कार्यक्रम थोडक्यात आवरला जाणार आहे. मात्र अजूनही अनिल कपूर किंवा त्यांच्या कुटुंबांकडून याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीय. करण आणि रिया तब्बल 13 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. इतक्या वर्षांच्या रिलेशनशिपनंतर हे दोघे लग्नासाठी तयार झाले आहेत.

(हे वाचा:लंडनमध्ये निक - प्रियंकाची रोमॅन्टीक डेट; एकमेकांसोबत असा वेळ घालवतय पॉवर कपल  )

याआधी रिया आणि करण सोशल मीडियावर एकमेकांवर प्रेम व्यक्त करताना दिसून आले आहेत. आपल्या रिलेशनशिपमुळे बऱ्याचवेळा हे दोघे चर्चेतही राहिले आहेत. या दोघांनी अनेकवेळा एकमेकांसोबतचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेयर केले आहेत. करणनेतर आधीचं सोशल मीडियावर रियाबद्दल आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. रिया कपूर ही एक निर्माती आहे. अनिल कपूरची मुलगी आणि सोनम कपूरची लाडकी बहीण कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. आणि आज अखेर रियाने करणसोबत लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: Bollywood News, Sonam Kapoor