मुंबई, 23 मे - कोरोना काळात (Corona Pandemic) प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबांबद्दल (Family) असणारं प्रेम व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अंगद बेदीने (Angad Bedi) असाच एक हार्टटचिंग व्हिडीओ सोशल मीडियावर (Instagram Video) शेयर केला आहे. अंगद कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतला आहे. आणि त्यानंतर त्याने आपल्या मुली आणि पत्नी नेहा धुपियाला (Neha Dhupia) भेटल्यानंतरचा क्षण चाहत्यांशी शेयर केला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते खुपचं भावुक होतं आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री नेहा धुपियाचा पती आणि अभिनेता अंगद बेदीने काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांनतर त्याला कोरोना लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे तो नेहा आणि आपली 2 वर्षांची मुलगी मेहेर पासून दूर आयसोलेशनमध्ये होता.
(हे वाचा: सोनूच्या पोस्टरवर होतोय दुधाचा अभिषेक; वाया जाणारं दूध पाहून संतापली अभिनेत्री)
आज तब्बल 16 दिवसांनंतर अंगदची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्याला घरी पाठवण्यात आलं आहे. तब्बल 16 दिवसांनंतर घरी परतल्याचा आनंद andच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. अंगदने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये अंगद घरी परतल्यानंतर मुलगी मेहेर आणि पत्नी नेहाशी बिलगून भावुक झालेला दिसत आहे.
(हे वाचा: 'गंदी बात' फेम अन्वेशी जैनच्या मादक अदा; या फोटोंची होतेय जोरदार चर्चा )
अंगदने व्हिडीओ शेयर करत त्याच्या कॅप्शन मध्ये म्हटलं आहे, ‘कोरोना प्रत्येक मानवजातीसाठी खुपचं कठोर आहे. मात्र त्याने प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटुंबाचं महत्व समजावलं आहे. आज 16 दिवसांनंतर माझा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आणि 16 दिवसानंतर मी माझ्या प्रेमळ बायको आणि मुलगीला बघत आहे. हा क्षण खुपचं खास आहे. नेहा आणि मेहेरने सुद्धा या अनिश्चित अशा वेळेला तोंड दिलं आहे. मात्र ती वेळ निघून गेली. आज आम्ही पुन्हा एकदा एकत्र आहोत. घरी परतण्यासारखा दुसरा कोणता आनंद नाहीय’. अशी भावुक पोस्ट अंगदने लिहिली आहे.
नेहा आणि अंगदच्या लग्नाला नुकताच 3 वर्ष पूर्ण झाले आहेत. अंगदने आपल्या सोशल मीडियावर काही खास फोटो शेयर करत या आठवणींना उजाळा देखील दिला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Corona, Covid-19, World After Corona