मुंबई, 22 मे- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने(Corona Second Wave) सर्वांनाचं हैराण केलं आहे. या काळात अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) लोकांना अफाट मदत करताना दिसत आहे. अनेक लोक त्याला देव म्हणून संबोधू लागले आहेत. कलाकार असो किंवा सर्वसामान्य लोक प्रत्येकजण सोनूचं कौतुक करत आहे. अशातचं सोनूच्या काही चाहत्यांनी त्याचे आभार व्यक्त करण्यासाठी, त्याच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक घातला आहे. मात्र हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) जाम भडकली आहे. कविताने ट्वीट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.
Humbled 🙏🙏 https://t.co/aQPOskdHgz
— sonu sood (@SonuSood) May 20, 2021
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आंध्रप्रदेश मधील श्रीकलाहस्ती येथील आहे. या व्हिडीओ मध्ये सोनू सूदचं भलं मोठं पोस्टर आहे. आणि काही लोक या पोस्टरवर दुधाचा अभिषेक करताना दिसत आहेत. यासाठी कित्येक लिटर दूध वापरण्यात आलं होतं. सोनू सूदने हा व्हिडीओ शेयर करत, त्या चाहत्यांचे आभार मानले आहेत.
We love @SonuSood and the nation will be indebted to him forever for his selfless acts, but I'm sure even Sonu will be unhappy with this foolish and uninspiring act of wasting milk in times where people are dying of hunger.. why are we so extra always with everything ??!! pic.twitter.com/liGuYuIYHt
— Kavita Kaushik (@Iamkavitak) May 20, 2021
मात्र छोट्या पडद्यावरील अभिनेत्री कविता कौशिक यावर प्रचंड नाराज झाली आहे. तिनं ट्वीट करत आपलं मत व्यक्त केलं आहे. कविताने ट्वीट करत म्हटलं आहे, ‘आपण सर्वजण सोनू सूदवर प्रेम करतो. आपला देश कायम त्यांच्या कामाशी कृतघ्न राहिलं. मात्र मला विश्वास आहे. की या मूर्ख आणि आणि निराशाजनक कामाचं सोनू सूदना देखील तितकचं वाईट वाटलं असेल. (हे वाचा: ‘एकीकडे नोरा आणि दुसरीकडे तू’; प्रिया बापटचा Video पाहून चाहते झाले सैराट ) कारण सध्या आपल्या देशात काय परीस्तिथी आहे. कित्येक लोक अन्नाशिवाय मरत आहेत. आणि अशामध्ये भुकेल्या लोकांचं पोट भरण्याऐवजी कित्येक लिटर दुध तुम्ही वाया करत आहात. का आपण प्रत्येक गोष्टीमध्ये इतकं अति करून जातो’. असं कवितानं म्हटलं आहे. (हे वाचा: Miss Universe18 व्या वर्षी दिसायची अशी; पाहा सुष्मिता सेनचा थ्रोबॅक फोटो ) सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. प्रत्येक लोक या परीस्थितशी झुंज देत आहे.