मुंबई, 18 मे- अली जफर(Ali Jafar) फक्त एक अभिनेताचं नव्हे तर लेखक, गायक आणि पेंटरसुद्धा आहे. या पाकिस्तानी कलाकाराने बॉलिवूडमध्ये (Bollywood) सुद्धा आपली खास ओळख निर्माण केली आहे. मात्र आपल्या देशात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आल्यानंतर त्याला पाकिस्तानला परतावं लागलं. आज अली जफर आपला 41 वा वाढदिवस(Ali Jafar's Birthday) साजरा करत आहे. पाहूया त्याच्याबद्दल काही खास गोष्टी.
View this post on Instagram
18 मे 1980 मध्ये लाहोर, पाकिस्तान याठिकाणी अली जफरचा जन्म झाला होता. शाळेमध्ये असताना तो अभ्यासात खुपच हुशार होता. त्याने दहावीमध्ये पहिला क्रमांक पटकावला होता. अभिनेता म्हणून प्रसिद्धी मिळण्याआधी अली जफर स्केच आणि पोर्ट्रेट तयार करत होता. तसेच काही काळानंतर तो गायक म्हणून चित्रपटांची गाणीसुद्धा म्हणू लागला. मात्र त्याला गायक म्हणून ओळख मिळाली ती ‘चनू’ मुळे. हे गाणं त्याच्या ‘हुक्का पाणी’ या अल्बममधील आहे. अली अभिनयासोबतचं ‘गुड लुक्स’ साठी सुद्धा ओळखला जातो.
View this post on Instagram
माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये अली जफर ‘आशियाई मोस्ट सेक्सीइस्ट मॅन’ च्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांनतर पुढच्याच वर्षी तो या यादीत अव्वल स्थानावर होता. ही रिपोर्ट ब्रिटीश वृत्तपेपर ‘इस्टर्न आय’ ने जाहीर केला होता.
(हे वाचा:Happy Birthday: वॉचमन ते अभिनेता, वाचा नवाजुद्दीन सिद्दिकीचा थक्क करणारा प्रवास )
अली जफरने 2009 मध्ये आपल्या गर्लफ्रेंड आयेशा सोबत लग्न केल होतं. आयेशाशी अलीची भेट स्केच आणि पोर्ट्रेट बनवत असताना झाली होती. असं म्हटलं जात की आयेशा ही बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लांबची नातेवाईक आहे. 2008 मध्ये आयेशा आणि अली एका डेटवर गेले असता त्यांना किडनॅप करण्यात आलं होतं. या दोघांना सोडविण्यासाठी यांच्या कुटुंबांना 25 लाख रुपयांची रक्कम द्यावी लागली होती.
(हे वाचा:HBD : सोनाली-कुणालचं शुभमंगल कधी? पाहा सोनालीला कसा भेटला साथीदार )
अली जफरने ‘तेरे बिन लादेन’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. तसेच त्याने बॉलिवूडमध्ये मेरे ब्रदर की दुल्हन, चष्मे बद्दूर, लंडन पॅरिस न्युयॉर्क यांसारख्या चित्रपटांत काम केल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.