अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) मागील वर्षी तिच्या रिलेशनशिपचा तसेच साखरपुड्याचा खुलासा केला होता. तर तिच्या वाढदिवशी तिने तिच्या एन्गेजमेंटची घोषणा केली होती. तर आता तिच्या साखरपुड्याला वर्ष उलटलं असल्याने सोनाली लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.
मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मागील वर्षी तिच्या साखरपुड्याची बातमी देत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता.
2 फेब्रुवारी 2020 ला त्यांचा साखरपुडा झाला होता. पण सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती.
सोनाली आणि कुणाल लंडन मध्ये नातेवाईकांच्या कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले.
कुणाल हा दुबईत एका मोठ्या हुद्दयावर वित्तीय अधिकारी म्हणून काम करतो. कामाव्यतिरिक्त तो एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.
दुबईत पारंपारिक मराठमोळ्या पद्धतिने त्यांनी साखरपुडा केला होता. तर मोजक्या कुटुंबियासोबत हा सोहळा पार पडला होता.
कुणालचे कुटुंबिय हे लंडन ला राहतात तर सोनलीचे कुटुंब भारतात असते त्यामुळे त्यांनी दुबईत साखरपुडा केला असल्याचं सोनाली म्हणाली होती.
दोघांच्याही साखरपुड्याला आता वर्ष उलटून गेलं आहे. पण अजूनही त्यांनी लग्न केलं नसल्याने सोनालीचे चाहते आता तिच्या लग्नाची वाट पाहत आहेत. सोनालीचा आज वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसाच्या अनंतर शुभेच्छा.