जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Happy Birthday: वॉचमन ते अभिनेता, वाचा नवाजुद्दीन सिद्दिकीचा थक्क करणारा प्रवास

Happy Birthday: वॉचमन ते अभिनेता, वाचा नवाजुद्दीन सिद्दिकीचा थक्क करणारा प्रवास

Happy Birthday: वॉचमन ते अभिनेता, वाचा नवाजुद्दीन सिद्दिकीचा थक्क करणारा प्रवास

Birthday: आज (nawajuddin siddiki) नवाजुद्दीन सिद्दिकी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 18 मे-   नवाजुद्द्दीन सिद्दिकी (Nawajuddin Siddiki)  बॉलिवूड(Bollywood)  मधील अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखल जातो. त्याने आपल्या अस्सल अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. मात्र नवाजुद्दीन सिद्दिकीचा हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. आज नवाजुद्दीन सिद्दिकी आपला 47 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या या प्रवासाबद्दल.

जाहिरात

नवाजुद्दीन सिद्दिकीचं जन्म उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील भुवना या गावी झाला आहे. तो एका शेतकरी कुटुंबातील होता. त्याचे वडील शेती करत होते. मात्र फारच कमी लोकांना माहित आहे, की नवाजुद्दीन सिद्दिकी चित्रपटांत येण्यापूर्वी एके ठिकाणी वॉचमन म्हणून नोकरी करत होता. अत्यंत हलाखीच्या परिस्थितून त्याने डोळे दिपवणारं यश संपादन केलं आहे. त्याला बालपणापासूनचं चित्रपटांची आवड होती. मात्र फक्त ईद, दिवाळी अशावेळीचं त्याला चित्रपट बघायला मिळत. त्यासाठी त्याला आधी पैसा जमा करावा लागे. आणि मग हे चित्रपट पाहता येत. चित्रपट पाहण्यासाठी त्याला परत शहर गाठावं लागत असे. नवाजुद्दीन सिद्दिकीने मुजफ्फरनगर मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांनतर त्याने छोट्या मोठ्या नाटकांत काम करायला सुरुवात केली होती. काही नाटकांत काम केल्यानंतर त्याला अभिनयाची गोडी लागली. आणि त्याचंवेळी त्याला वाटू लागलं की आपण अभिनय क्षेत्रातचं काहीतरी केल पाहिजे. (हे वाचा: प्रियंका चोप्राचा पती निक जोनस जखमी, शोच्या शुटिंग दरम्यान झाली दुखापत   ) आणि म्हणूनच त्याने दिल्ली मधील ‘नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा’ मध्ये प्रवेश घेतला होता. याठिकाणी शिक्षण पूर्ण करून त्याने आपला मोर्चा मुंबईकडे वळवला होता. मात्र मुंबईमध्ये आल्यानंतर सुद्धा त्याचा संघर्ष थांबला नव्हता. कित्येक लोकांनी त्याची सर्वसाधारण अंगकाठी आणि सावळा रंग बघून चित्रपटात घेण्यास नाकारलं. (हे वाचा: शिक्षकाला धडा शिकवणारी अभिनेत्री आहे तरी कोण? पाहा सौदर्यांचे सुंदर PHOTOS ) त्याला काही चित्रपट मिळाले मात्र त्यात एक किंवा दोनचं सीन मिळाले. नवाजुद्दीनचा हा संघर्ष तब्बल पाच वर्षे चालला. त्यानंतर अनुराग कश्यपने त्याला आपल्या ‘ब्लॅक फ्रायडे’ या चित्रपटासाठी निवडलं. आणि या चित्रपटातून त्याच्या अभिनयाची खरी चुणूक दिसून आली. नवाजुद्दीनने सरफरोश, पिपली लाइव, किक, बजरंगी भाईजान अशा अनेक चित्रपटात उत्कृष्ट काम केल आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात