मुंबई, 15 मार्च: बॉलिवूड मधील प्रसिद्ध प्रोड्यूसर आणि अभिनेता म्हणून अभय देओलला ओळखलं जातं. बॉलिवूडमधील He man म्हणून ओळखले जाणारे सुप्रसिद्ध अभिनेता धर्मेद्र यांचा तो पुतण्या आहे. पण अभयने स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे. (Abay Deol Birthday) त्याचबरोबर सनी देओल, बॉबी देओल, ईशा देओल, आहना देओल यांचा तो चुलत भाऊ आहे. तसेच अभय देओलचे वडील अजितसिंग देओल हेसुद्धा बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माता आणि निर्देशक आहेत. त्यामुळे लहानपणापासूनचं अभय देओलला अभिनयाचा वारसा मिळाला होता.
15मार्च 1976 मध्ये मुंबई येथे अभयचा जन्म झाला. अभयनं मुंबईमध्ये असताना आपलं शिक्षण अर्धवट सोडून दिलं होतं. त्याच्या म्हणण्यानुसार त्याच्या डोक्यात आपल्या करिअरला घेऊन पत्रकारिता, पेंटीग, फिलॉसॉफर आणि अभिनेता अशा 4 कल्पना होत्या. मात्र नंतर त्यानं अभिनय हेच क्षेत्र निवडलं. म्हणजेच अभिनेता ऐवजी आपल्याला अभयला एक पत्रकार म्हणूनसुद्धा बघता आलं असतं. अभयनं न्यूयॉर्क मधून अभिनय आणि नाटकाचं शिक्षणसुद्धा घेतलं आहे. अभय देओलनं 2005 मध्ये ‘सोचा ना था’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या चित्रपटात अभयची सहभिनेत्री म्हणून आयेशा टाकिया होती. अभयने आपल्या अभिनय कारकिर्दीत गंभीर, कॉमेडी, प्रेमी अशा वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. देव डी आणि ओए लक्की लक्की ओए या चित्रपटांतून अभयच्या अभिनयाला प्रेक्षकांची खास पसंती मिळाली होती. (**हे वाचा:** सातवीत असताना आलिया सोडणार होती शाळा; शिक्षणासाठी वडिलांनी वापरली ही युक्ती ) अभय सोशल मीडियावर सुद्धा सक्रीय दिसून येतो. मध्यंतरी त्यानं सोशल मीडियाद्वारे व्यक्त होतं नेपोटीझमवर आपलं मत मांडलं होतं. अभय देओलने आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक चित्रपटांत काम केलं आहे. 2012मध्ये अभय सोनम कपूर आणि धनुष यांच्या सोबत रांझणा या चित्रपटात झळकला होता. त्याचबरोबर अभयनं शांघाई, जिंदगी नं मिलेगी दोबारा, एक चालीस कि लास्ट लोकल, चक्रव्यूह, आयेशा, तेरा क्या होगा जॉनी, आहिस्ता आहिस्ता अशा अनेक चित्रपटांतून आपला अभिनय दाखवला आहे.