Home /News /entertainment /

16 वर्षाच्या संसारानंतर झाला होता घटस्फोट; वाचा आमिर-रीनामध्ये का आला होता दुरावा

16 वर्षाच्या संसारानंतर झाला होता घटस्फोट; वाचा आमिर-रीनामध्ये का आला होता दुरावा

अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ता यांची लव्हस्टोरीसुद्धा अगदी फिल्मी आहे.

    मुंबई, 3 जुलै-   बॉलिवूड अभिनेता (Bollywood) आमिर खान (Aamir Khan) आज खुपचं चर्चेत आहे. कारणही तसचं आहे. आमिरने आपली दुसरी पत्नी किरण रावसोबत घटस्फोट घेतला आहे. आमिर आणि किरणचं 15 वर्षांचं वैवाहिक जीवन संपुष्टात आल्यानं सोशल मीडियावर मोठी चर्चा होतं आहे. तसेच यानिमित्ताने आमिर खानचं पहिली पत्नी आणि घटस्फोटसुद्धा चर्चेत आलं आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया आमिर आणि पहिली पत्नी रीना (Reena Dutta) यांचा घटस्फोट कसा झाला होता. अभिनेता आमिर खान आणि रीना दत्ता यांची लव्हस्टोरीसुद्धा अगदी फिल्मी आहे. आमिर खान आणि रीना हे एकमेकांचे शेजारी होते. रीना आमिरच्या अगदी घरासमोर राहात होती. आमिरचं चित्रपटात येण्यापूर्वीच रीनावर प्रेम जडलं होतं. मात्र शिक्षण घेत असलेल्या रीनाला आमिरमध्ये अजिबात रस नव्हता. आमिर तिला बघण्यासाठी आपल्या घराच्या खिडकीत बसून राहायचा. मात्र रीना त्याला भाव देत नव्हती. एकदा आमिरने रीनाला प्रपोज केलं होतं. मात्र तिने स्पष्ट नकार दिला होता. त्यांनतर आमिरने तो विषयचं सोडून दिला होता. (हे वाचा:आमिर-किरणच्या Love Story मध्ये तो फोन कॉल ठरला 'टर्निंग पॉइंट'  ) काही वेळेनंतर रीना स्वतः आमिरमध्ये रस घेऊ लागली होती. आणि तिने आमिरला होकारसुद्धा दिला होता. म्हणूनचं आमिर आणि रीनाने गुपचूप कोर्टमेरेज केलं होतं. आणि हे लग्न बरेच दिवस सर्वांपासून लपवून ठेवलं होतं. फारच कमी लोकांना माहिती आहे की, ‘कयामत से कयामत तक’ या पहिल्या चित्रपटाच्यावेळी आमिर खान विवाहित होता. लग्नाच्यावेळी आमिर 21 आणि रीना 19 वर्षाची होती. (हे वाचा:माध्यमांसमोर KISS करत सर्वांनाचं केलं होतं अवाक्; वाचा आमिर-किरणचा तो किस्सा  ) इतकं प्रेम असूनदेखील दोघांनी तब्बल 16 वर्षे संसार करून घटस्फोट घेतला होता. असं म्हटलं जातं की ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर आमिर आणि किरण रावमध्ये वाढलेली जवळीकचं या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा निर्माण करण्यास कारण ठरली होती. मात्र आमिर खानने या सर्व गोष्टींना चुकीचं ठरवलं होतं. आमिरची पहिली पत्नी रीना ही ‘लगान’ ची निर्माती होती. तर दुसरी पत्नी किरण राव याच चित्रपटाची सह दिग्दर्शक होती.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News

    पुढील बातम्या