मुंबई 3 जून**:** आमिर खान आणि किरण राव यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात परफेक्ट कपल म्हणून पाहिलं जात होतं. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आमिरनं जवळपास 15 वर्ष किरणसोबत संसार केला. परंतु गेले काही महिने दोघांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत होत्या. अखेर या बातम्या खऱ्या निघाल्या. कारण आमिर आणि किरण यांनी घटस्फोट घेतला आहे. आमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत ही धक्कादायक माहिती आपल्या चाहत्यांना दिली. आज जरी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असला तरी कधीकाळी दोघांच्या अनोख्या लव्हस्टोरीची प्रचंड चर्चा होती. पाहुया 15 वर्षांपूर्वी आमिर आणि किरण कसे पडले होते एकमेकांच्या प्रेमात? किरण राव आणि आमिर खान यांच्या वयातील अंतर माहीत आहे का? 15 वर्षांनी मोडला संसार
Actor Aamir Khan and his wife Kiran Rao, in a joint statement announce divorce after 15 years of marriage.
— ANI (@ANI) July 3, 2021
The couple said, "We would like to begin a new chapter in our lives - no longer as husband and wife, but as co-parents and family for each other." pic.twitter.com/gnQd2UPLTZ
‘कसौटी जिंदगी की’ फेम प्राचीन चौहानला अटक; तरुणीसोबत छेडछाड केल्याचा आरोप किरण आणि आमिरची पहिली भेट 2001 साली ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. याविषयी आमिरने एका मुलाखतीत सांगितलं होतं. त्यावेळी किरण सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत होती. खरं तर ते दोघंही एकमेकांसाठी अनोळखी होते. कारण ती फक्त चित्रपटाच्या टीमचा एक भाग होती. त्यानंतर आमिर आणि रिनाचा घटस्फोट झाला, याच काळात तो एकदा किरणसोबत फोनवर बोलला. त्यावेळी जवळपास अर्धा तास दोघं एकमेकांसोबत फोनवर बोलत होते. फोनवर बोलताना आमिरला जाणवलं की तिच्याशी बोलत असताना तो खूप आनंदी होतो. या संभाषणानंतर दोघांच्या गाठीभेटी वाढल्या आणि ते रिलेशनशीपमध्ये आले. जवळपास एक-दीड वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. आणि मग त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.