Home /News /entertainment /

VIDEO: माध्यमांसमोर KISS करत सर्वांनाचं केलं होतं अवाक्; वाचा आमिर-किरणचा तो किस्सा

VIDEO: माध्यमांसमोर KISS करत सर्वांनाचं केलं होतं अवाक्; वाचा आमिर-किरणचा तो किस्सा

किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती.

    मुंबई, 3 जुलै-  बॉलिवूडचा (Bollywood Actor)  मि. परफेक्शनिस्ट अशी अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) ओळख आहे. बॉलिवूडमध्ये आमिर खानच्या चित्रपटांची जितकी चर्चा होते, तितकीच तिच्या आणि किरण रावच्या (Kiran Rao) लव्हस्टोरीचीसुद्धा. मात्र नुकताच घटस्फोट घेत या जोडीने सर्वांनाचं आश्चर्याचा धक्का दिला आहे. नेहमीचं सार्वजनिक ठिकाणी या दोघांनामधील प्रेम आपल्याला पाहायला मिळालं आहे. आज आपण या जोडीच्या अशाच एका किस्स्याबद्दल जाणून घेणार आहोत. सन 2018 मध्ये अभिनेता आमिर खानने मीडियासमोर आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी पत्नी किरण रावसुद्धा होती. यावेळी मोठ्या प्रमाणात मीडिया त्या ठिकाणी उपस्थित होती. आमिर खानने केट कट केला. तसेच आमिर आणि किरणने एकमेकांना केक भरवला. आणि त्यानंतर आमिरने  चक्क सर्वांसमोर किरण रावला किससुद्धा केलं होतं.त्यामुळे सर्वांनाच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. यावेळी आमिर आणि किरणच्या या किसची बरीच चर्चासुद्धा सोशल मीडियावर झाली होती. (हे वाचा:मि. परफेक्शनिस्टचं लग्न दुसऱ्यांदा मोडलं! आमिर खान आणि किरण राव यांनी घेतला तलाक  ) किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांची पहिली भेट ‘लगान’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. आमिर खान मुख्य भूमिकेत असलेल्या या चित्रपटात किरण राव ही सहाय्यक दिग्दर्शक होती. मात्र सेटवर त्यांचं फारसं बोलणं कधी झालं नव्हतं. मात्र त्यांनतर आमिर खानचं आपली पहिली पत्नी रीना दत्तासोबत ज्यावेळी घटस्फोट झाला. त्यावेळी किरण राव आणि आमिर खानचं पहिल्यांदा फोनवर बोलणं झालं होतं. यावेळी जवळजवळ अर्धा तास बोलणं झालं होतं. या संवादानंतर आमिर खानला किरण रावशी बोलायला आवडू लागलं होतं. त्यानंतर या दोघांमध्ये डेटिंग सुरु झाली होती.  लग्नाआधी दीड वर्ष आधी आमिर खान आणि किरण राव सोबत राहिले होते. त्यांनतर सन 2005 मध्ये या दोघांनीही लग्न केलं होतं. या दोघांना आझाद नावाचा एक मुलगादेखील आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood

    पुढील बातम्या