जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिर खान अभिनय सोडून करणार हे काम, एसएस राजामौली यांच्या RRR साठी सांभाळणार मोठी जबाबदारी

आमिर खान अभिनय सोडून करणार हे काम, एसएस राजामौली यांच्या RRR साठी सांभाळणार मोठी जबाबदारी

आमिर खान अभिनय सोडून करणार हे काम, एसएस राजामौली यांच्या RRR साठी सांभाळणार मोठी जबाबदारी

अभिनेता आमिर खान (Aamir Khan) आणि चिरंजीवी (Chiranjeevi) आता एसएस राजामौली (SS Rajamouli)यांचा बहुचर्चित सिनेमा RRR शी जोडले जाणार आहे. विशेष म्हणजे हे दोधे यामध्ये अभिनय नाही तर एक वेगळीच भूमिका निभावणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 नोव्हेंबर: अभिनेता आमिर खान (Aamir Khan), चिरंजीवी (Chiranjeevi) आणि एसएस राजामौली (SS Rajamouli) या  तिन्ही दिग्गजांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एखाद्या सिनेमा किंवा नाटकामध्ये जसे कलाकार महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे यामधील कथा सांगणारा देखील महत्त्वाचा असतो- तोच सूत्रधार असतो. आमिर आणि चिरंजीवी देखील RRR मध्ये अशाप्रकारे सूत्रधाराची अर्थात स्टोरी टेलरची जबाबदारी सांभाळणार आहेत. या सिनेमामध्ये ज्युनिअर एनटीआर (Jr NTR) आणि राम चरण (Ram Charan) मुख्य भूमिकेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार चिरंजीवी या सिनेमाच्या तेलुगू व्हर्जनसाठी सूत्रधाराची भूमिका निभावणार आहे, तर आमिर खान हिंदी व्हर्जनमध्ये सिनेमातील पात्रांची ओळख करून देणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे. डिव्हीव्ही दानय्या निर्मित RRR सिनेमाची दाक्षिणात्य भागातच नव्हे तर देशभर प्रतीक्षा केली जात आहे. हा सिनेमा 2021 मध्ये मकर संक्रात दिवशी प्रदर्शित केला जाणार होता, पण कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाल्यानंतर याच्या रिलीजबाबत घोषणा केली जाणार आहे. (हे वाचा- लग्नाआधी देशमुखांच्या सुनेला करिअरविषयी ऐकावी लागली होती बोलणी,स्वत: केला खुलासा) मोठ्या ब्रेकनंतर ऑक्टोबरमध्ये या सिनेमाचं शूटिंग हैदराबादमध्ये सुरू झालं आहे. या सिनेमाच्या टीमने नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये असं दिसंत होतं की कडाक्याच्या थंडीचा सामना शूटिंगवेळी करावा लागत होता. ज्युनिअर एनटीआर शिवाय या सिनेमामध्ये अजय देवगण, आलिया भट्ट आणि समुथिरकानी मुख्य भूमिकेत आहेत. अजय  आणि आलिया या सिनेमातून त्यांचा तेलुगू डेब्यू करणार आहेत. यामध्ये श्रीया सरन फ्लॅशबॅक सीनमध्ये अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. आरआरआर हा सिनेमा दोन लोकप्रिय क्रांतीकारकांच्या जीवनावर आधारित आहे- अल्लूरी सीताराम राजू आणि कोमाराम भीम.

जाहिरात

यामध्ये राम चरण अल्लूरी सीताराम राजू यांच्या तर एनटीआर भीम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी मेकर्सनी कोमाराम भीम यांची भूमिका साकारणाऱ्या ज्युनिअर एनटीआरचा या सिनेमाबाबतचा एक व्हिडीओ जारी केला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात