Home /News /entertainment /

यशराज बॅनरकडून आणखी एका स्टार किडला संधी, याआधी प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं होतं रिजेक्ट

यशराज बॅनरकडून आणखी एका स्टार किडला संधी, याआधी प्रसिद्ध दिग्दर्शकाने केलं होतं रिजेक्ट

जुनैद खान (Junaid Khan) संदर्भात नुकतीच काही दिवसांपूर्वी एक आश्चर्यकारक बाब समोर आली होती. जुनैद खान मल्याळम सिनेमा 'इश्क'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशी चर्चा होती. मात्र दिग्दर्शक नीरज पांडे यांनी त्याला रिजेक्ट केले आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 21 ऑक्टोबर : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेता आमिर खान (Aamir Khan)चा मुलगा जुनैंद खान (Junaid Khan) गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. जुनैदबाबत काही दिवसांपूर्वीच एक आश्चर्यकारक बाब समोर आली होती. ही बातमी अशी होती की, मल्याळम सिनेमा 'इश्क'च्या (Ishq) हिंदी रिमेकमधून तो बॉलिवूडमध्ये एंट्री करणार होता. मात्र नीरज पांडे (Neeraj Pandey) यांच्या प्रोडक्शनमध्ये बनणाऱ्या या सिनेमाच्या ऑडिशनमध्ये जुनैदला रिजेक्ट करण्यात आले आहे. यशराज बॅनरच्या फिल्ममधून करणार बॉलिवूड करिअरची सुरुवात जुनैदला रिजेक्ट केल्याचे ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. ज्याचे वडील यशाच्या शिखरावर आहेत, त्यांचा मुलगा ऑडिशनमध्येच रिजेक्ट झाला यावर अनेकांचा विश्वास बसत नाही आहे. दरम्यान आता अशी बातमी समोर येत आहे की, आता स्वत: आमिर खानने त्याच्या मुलासाठी पुढाकार घेतला आहे. पीपिंगमून मध्ये देण्यात आलेल्या एका बातमीनुसार जुनैद खान आता यशराज बॅनरच्या (YRF) एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. (हे वाचा-VIDEO:प्रीती झिंटाने तब्बल 20 वेळा केली कोरोना टेस्ट! Bio Bubble मध्ये असं असतं) सत्यघटनेवर आधारित असणार सिनेमा अहलावाच्या मते, हा सिनेमा सिद्धार्थ पी मल्होत्रा दिग्दर्शित करणार आहेत. यामध्ये जुनैद खान एका वर्तमानपत्राच्या संपादकाच्या रुपात  दिसणार आहे. या सिनेमामध्ये 'बंटी और बबली 2' मधून बॉलिवूड डेब्यू करणारी अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharvari Wagh) जुनैदबरोबर असणार आहे. अशी माहिती मिळते आहे की हा सिनेमा 1862 मधील जादूनाथ जी बृजनाथ जी महाराज केसवर आधारित आहे. वायआरएफकडून पुढील महिन्यातच या चित्रपटाची घोषणा केली जाऊ शकते. (हे वाचा-सनी देओलने साजरा केला 64वा वाढदिवस! धर्मेंद्र आणि बॉबी देओलबरोबरचे खास PHOTOS) विपूल मेहता आणि स्नेहा देसाई यांनी या सिनेमाचे लेखन केले असून, सिद्धार्थ पी मल्होत्रा-ज्यांनी याआधी वायआरएफसाठी 'हिचकी'चे दिग्दर्शन केले आहे ते हा सिनेमा दिग्दर्शित करणार आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood, Yashraj films

    पुढील बातम्या