बॉलिवूड अभिनेता सनी देओलने (Sunny Deol) 19 ऑक्टोबरला त्याचा 64वा वाढदिवस (64th Birthday Party) साजरा केला. त्याच्या वाढदिवशी देओल कुटुंबातील तीनही स्टार्स एकत्र आले होते. सनी देओलचा वाढदिवन धर्मेंद्र आणि बॉबी देओल यांनी खास पद्धतीने साजरा केला. या पार्टीचे फोटो देखील एकदम खास आहेत. धर्मेंद्र यांनी हे फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य-@iamsunnydeol/Instagram)
या पार्टीमध्ये कुटुंबातील खास सदस्य सहभागी झाले होते. धर्मेंद्र यांनी त्यांच्या लाडक्या मुलाच्या वाढदिवसाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल होत आहेत. (फोटो सौजन्य- @aapkadharam/Twitter)
देओल कुटुंबातील तिसरी पिढी देखील या फोटोंमध्ये दिसली. धर्मेंद्र यांनी हे फोटो शेअर करताना असे म्हटले आहे की, 'त्याच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रार्थनांसह देओल स्टाइलमध्ये सनीच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन...' (फोटो सौजन्य- @aapkadharam/Twitter)
सनी देओलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये त्याचा भाऊ अभिनेता बॉबी देओल देखील उपस्थित होता. सनीच्या एका बर्थडे केकवर 'हॅपी बर्थडे सनी भैया' असे देखील लिहलेले होते (फोटो सौजन्य-. @aapkadharam/Twitter)
'हॅपी बर्थडे सनी भैया' लिहलेला केस बॉबी देओलने आणल्याचे स्पष्ट होते आहे. त्यावरील खास मेसेजने सनीचा वाढदिवस एकदम स्पेशल बनवला. सनीने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. (फोटो सौजन्य- @iamsunnydeol/Instagram)