मुंबई 29 मे: कोरोनाने सगळ्या जगात थैमान घातलं आहे. लोक घरांमध्ये बंदिस्त आहेत. मनोरंजनासाठी काय करावं हा सगळ्यांसाठी मोठा प्रश्न झालाय. लॉकडाऊनमुळे शुटींग बंद असल्याने टीव्हीवर नवं काहीच येत नाही. त्यामुळे अनेक फंडे शोधून काढले जात आहेत. इतर अनेक देशांप्रमाणेच रशियामध्येही बॉलिवूडची जादू आहे. तिथे अनेक हिंदी चित्रपट हे रशियन भाषेत डब करून दाखवले जातात. नुकताच रशियन टीव्हीवर बाहुबली हा चित्रपट दाखविण्यात आला होता. रशियाच्या भारताततील राजदुतावासतर्फेच त्याची माहिती ट्विटरवर देण्यात आली होती.
भारतात लॉकडाऊनच्या काळात रामायण, महाभारत या जुन्या मालिका पुन्हा दाखविण्यात आल्या आणि त्यांना तुफान प्रतिसाद मिळाला. जगातले TRPचे रेकॉर्ड्सही त्यांनी तोडले आहेत. त्याचप्रमाणे रशियातले गेले काही दिवस टीव्हीवर गाजलेले हिंदी सिनेमे दाखवले जात आहेत.
बाहुबलीने भारतातही जोरदार हवा निर्माण केली होती. हा चित्रपट दिर्घकाळ हिट ठरला होता आणि त्याने भरपूर कमाईही केली होती. भव्य दिव्य सेट, उत्तम पटकथा, त्याच प्रकारचं शुटिंग आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले होते.
🎬 Indian cinema gains popularity in Russia. Look what Russian TV is broadcasting right now: the Baahubali with Russian voiceover! pic.twitter.com/VrIgwVIl3b
— Russia in India (@RusEmbIndia) May 28, 2020
हिंदीसोबतच अनेक देशांमध्ये हा चित्रपट डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे दोन भाग निघाले आणि ते दोनही भाग त्याच्या भव्यतेमुळे तुफान गाजले.
हेही वाचा -
पालखी सोहळ्याबद्दल मोठा निर्णय! पायी वारी रद्द पण पादुका पोहोचणार
'जिंदगी कैसी ये पहेली' सारख्या अजरामर गाण्यांचे गीतकार कवी योगेश यांचं निधन
देशांतर्गत बाजारात सोन्याचांदीच्या किंमती वाढल्या, जाणून घ्या काय आहेत दर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bahubali