मुंबई, 30 जुलै : बॉलिवूडचा पॉवर पॅक्ड अभिनेता म्हणून ओळखला जाणारा अभिनेता रणवीर सिंह गेल्या काही दिवसांपासून न्यूड फोटोशूटमुळे प्रचंड चर्चेत आहे. रणवीरचे न्यूड फोटो समोर आलेत आणि सोशल मीडियावर एकच खळबळ माजली. न्यूड फोटोशूट करत रणवीरनं सगळ्यांनाचा थक्क करुन सोडलंय. या फोटोंमुळे रणवीरला अनेक ट्रोलिंग आणि आरोपांचा सामना करावा लागला आहे. एवढंच काय तर न्यूड फोटोशूट प्रकरणी रणवीरविरोधात एफआयआर देखील दाखल करण्यात आली आहे. पण अशातच बॉलिवूडचे कलाकार त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आले आहेत. रणवीर सिंहने अलीकडेच पेपर मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. एकीकडे त्याच्यावर टीका होत असतानाच दुसरीकडे आलिया भट्ट आणि सुमोना चक्रवर्ती सारख्या अभिनेत्री त्याला पाठिंबा देण्यासाठी पुढे आल्या होत्या. त्यातच आज बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनने या शूटबद्दल आपले मत व्यक्त केले. तिने खूपच सहजरित्या रणवीरला पाठिंबा दिला आहे. तिचे वक्तव्य ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
विद्या बालन सुरुवातीपासूनच स्पष्टवक्ती आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तिच्या विधानांमधून वेळोवेळी हे सिद्ध झालं आहे. हेही वाचा - Siddharth Chandekar : सिध्दार्थ चांदेकरची लंडनच्या रस्त्यावर धम्माल, मजेशीर VIDEO केला शेअर ती नेहमीच तिच्या मनात जे असेल ते ती कॅमेरासमोर बोलून दाखवते. म्हणून जेव्हा तिला नुकतेच रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूट आणि त्याच्याविरुद्ध झालेल्या एफआयआरबद्दल तिचं मत विचारण्यात आले तेव्हा, विद्याने खूपच अनपेक्षित उत्तर दिलं. ती म्हणाली, ‘तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, पहिल्यांदा कोणीतरी पुरुष असं करत आहे, आम्हालाही जरा बघू द्या ना.’ पुढे ती म्हणाली, ‘तुम्हाला नसेल बघायचं तर बघू नका. पेपर फाडून टाका.’ तिला एफआयआरबद्दल विचारलं तेव्हा, ‘ज्या लोकांना आयुष्यात दुसरी कामं नाहीत ते लोक एफआयआर करत आहेत.’ असं मत तिने व्यक्त केलं आहे. अभिनेत्री विद्या बालनने रणवीर सिंहला दिलेल्या या हटके पाठींब्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तिने हे केलेलं वक्तव्य अनेक जणांना पटलेलं दिसून येतंय. तिचा हा हटके अंदाज प्रेक्षकांना आवडला आहे. विद्या बालन चा ‘जलसा’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. येणाऱ्या काळात ती नवीन भूमिकांमध्ये बघायला मिळेल.