जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Siddharth Chandekar : सिध्दार्थ चांदेकरची लंडनच्या रस्त्यावर धम्माल, मजेशीर VIDEO केला शेअर

Siddharth Chandekar : सिध्दार्थ चांदेकरची लंडनच्या रस्त्यावर धम्माल, मजेशीर VIDEO केला शेअर

Siddharth chandekar in london

Siddharth chandekar in london

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो त्याच्या फोटोजना अतिशय भन्नाट कॅप्शन देत चाहत्यांसोबत ते शेअर करत असतो. आजही सोशल मीडियावर त्याने एक भन्नाट पोस्ट शेअर केली आहे. सिध्दार्थने चक्क ड्रायव्हिंग करत करत व्हिडीओ शूट केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 29 जुलै : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तो त्याच्या फोटोजना अतिशय भन्नाट कॅप्शन देत चाहत्यांसोबत ते शेअर करत असतो.  त्याचा  खट्याळ अंदाज प्रेक्षकांना आवडतो. आता त्याने एक मजेदार व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. आजही सोशल मीडियावर त्याने एक भन्नाट  पोस्ट शेअर केली आहे. सिध्दार्थने चक्क ड्रायव्हिंग करत करत व्हिडीओ शूट केला आहे. तो या व्हिडीओ मध्ये लंडनमध्ये मर्सिडीज गाडी चालवत आहे. ती चालवत असतानाच त्याने हा व्हिडीओ शूट केलाय. यामध्ये तो म्हणतोय की, ‘लंडनमध्ये गाडी चालवण्यासाठी तुम्हाला परमिशनची काहीच गरज लागत नाही, गाडी चालवता येत नसली तरी तुम्ही लंडनमध्ये गाडी चालवू शकता.’ आता तुम्हाला या गोष्टीचं आश्चर्य वाटू शकतं. पण त्याने त्यामागचं कारणही सांगितलं आहे. खरं तर तो तिथे शूट करतोय. आणि त्यादरम्यानच त्याने हा व्हिडीओ शूट केला आहे. त्यामुळे हात न लावताही  तो गाडी चालवू शकतोय.

जाहिरात

हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत त्याने कॅप्शन सुद्धा तसेच मजेदार लिहिलं आहे. त्याने लिहिलंय की, ‘तुम्हाला जाम वाटेल  मर्सिडीज चालवुया. पण परमिशन नको का?’ असं म्हणत त्याने व्हिडीओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी भरपूर  लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत. हेही वाचा - Sharmishtha Raut : ‘माझा नवरा जगात भारी’ म्हणत अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने केली तेजसबद्दल पोस्ट सिद्धार्थ सध्या लंडनमध्ये लोकेश गुप्ते दिग्दर्शित CONGRATULATIONS या आगामी चित्रपटाचे शूटिंग करतोय. दरम्यान CONGRATULATIONS सिनेमात सिद्धार्थसोबत अलका कुबल आणि पूजा सावंत झळकणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात