मुंबई, 18 एप्रिल: सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटात ‘सुनामी सिंग’ची (Bodyguard Fame Tsunami Singh Hospitalized) भूमिका साकारणाऱ्या रजत रवैलला (Rajat Rawail Hospitalized) तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याच्या उजव्या पायाची नस फाटल्याने त्यातून खूप रक्तस्राव झाला आहे. सध्या रवैलची तब्येत ठीक असून वृत्तानुसार त्याला सोमवारीच (18 एप्रिल) रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो. ETimes शी केलेल्या संभाषणात रवैलने अशी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘सध्या रक्तस्त्राव थांबला आहे, जो माझ्या पायाच्या व्हेरिकोज व्हेन्समधून होत होता आणि माझ्या जखमाही बऱ्या होत आहेत.’ तो म्हणाला की, ‘डॉक्टरांनी मला बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे, तसेच मला कुणालाही भेटण्यास मनाई केली आहे. मी लवकरच लीलावती रुग्णालयाचे वरिष्ठ सर्जन डॉ. पंकज पटेल यांची भेट घेणार आहे. त्यांच्याकडून, मी शस्त्रक्रियेबद्दल दुसरे मत घेईन जेणेकरून मला भविष्यात त्या आधारावर उपचार मिळू शकतील.’ हे वाचा- ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर रुपाली भोसलेला दुखापत, समोर आला फोटो आता त्याची तब्येत सुधारली असल्याची माहिती रवैलने दिली आहे. त्याने लोकांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे त्याच्याबाबत काळजी वाटणाऱ्यांचे आभार मानले आहेत हे वाचा- एका सीनमुळे कायमस्वरुपी बिघडला चेहरा, शिक्षणही मिळालं नाही; तरी या ‘खाष्ट सासू’ने मोठ्या पडद्यावर केलं अधिराज्य सलमान खानसह आहे खूप चांगली मैत्री रजत रवैल शेवटचा वरुण धवन आणि सारा अली खानच्या ‘कुली नंबर 1’ मध्ये दिसला होता. त्याने इतरही अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. रजत अनेकदा चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकेत दिसतो. मात्र सध्या त्याच्या वजनामुळे तो खूप अस्वस्थ आहे. रजत आणि सलमान खान यांची देखील खूप चांगली मैत्री आहे. ‘बॉडीगार्ड’ चित्रपटातील ‘सुनामी सिंग’ या त्याच्या भूमिकेने त्याने लोकांची मने जिंकली होती. 2013 मध्ये सलमान खानच्या ‘बिग बॉस 7’ या रिअॅलिटी शोचाही तो भाग होता. याशिवाय त्याने ‘पोलिसगिरी’, ‘जुडवा 2’ आणि ‘देसी मॅजिक’ सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







