मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बाहुबलीसारख्या BIG BUDGET मध्ये झळकणार बॉबी देओल; 'आश्रम'मुळे करिअरला मोठी कलाटणी

बाहुबलीसारख्या BIG BUDGET मध्ये झळकणार बॉबी देओल; 'आश्रम'मुळे करिअरला मोठी कलाटणी

Boby deol

Boby deol

'आश्रम' या वेब सिरीजच्या अपार यशानंतर अभिनेता बॉबी देओल एका भव्य चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार आहे.

मुंबई, 30 जानेवारी: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल (Bobby deol) सध्या बॉलिवूडपासून (Bollywood) दूर आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा हाऊसफुल-4 (Housefull-4) हा चित्रपट आला होता. त्यानंतर आश्रम (Ashram) नावाच्या वेब सिरीजमध्ये त्याने केलेल्या भूमिकेला मोठी प्रसिद्धी देखील मिळाली होती. ‘काशीपुर वाले बाबा’या त्याच्या भूमिकेचे मोठं कौतुक करण्यात आलं होतं. यानंतर आता त्याला मोठी लॉटरी लागली असून दाक्षिणात्य चित्रपटामध्ये लवकरच बॉबी दिसणार आहे.

माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार, दाक्षिणात्य चित्रपटामध्ये त्याला भूमिका ऑफर झाली आहे.

हा चित्रपट खूप भव्यदिव्य असणार असून बाहुबलीच्या समान हा नवीन चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आलेलं नाही. यामध्ये बॉबी व्हिलनची भूमिका साकारणार असून आश्रमामधील त्याच्या भूमिकेनंतर त्याचे करिअर वेग पकडू शकते. मागील काही वर्षांपासून  देओल काम मिळत नसल्याने तो मोठ्या पडद्यावर दिसत नव्हता. कोरोनाच्या या संकटात अनेकजण चित्रपटांचे शूटिंग सुरु नसल्याने वेबसीरिजकडे वळले आहेत. याच दरम्यान बॉबी देओल याने आश्रम सिरीजमध्ये केलेल्या बाबाजी या भूमिकेने त्याला मोठी मदत केली. या सीरिजला देखील मोठी प्रसिद्धी मिळाली.

प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या ‘आश्रम’ (Ashram) वेब सीरीज मधील भूमिकेमुळे अनेक मोठे चित्रपट बॅनर्स बॉबीकडे वळले आहेत. अनेक दिग्दर्शकांनी आणि निर्मात्यांचे देखील त्याने लक्ष वेधून घेतलं आहे. विविध बॅनर्सच्या ऑफर्स देखील त्याला मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता या दाक्षिणात्य चित्रपटामधील भूमिकेमुळे त्याची अभिनयाची गाडी रुळावर लागण्याची शक्यता आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला बॉबी देओल याने अनेक सुपरहिट चित्रपट देत बॉलिवूडमध्ये आपले पाय रोवले होते. परंतु हळूहळू नवीन अभिनेत्यांच्या प्रवेशाने त्याला बॉलिवूडमध्ये आपलं स्थान टिकवून ठेवण्यात अपयश आलं होतं.

हे देखील वाचा - 'ऑस्कर जिंकणारी तू पहिली जोनस असशील...', प्रियांकाबाबत निकने व्यक्त केला विश्वास

दरम्यान, या दाक्षिणात्य चित्रपटाबरोबरच बॉबी देओल लव्ह हॉस्टेल)Love Hostel) या सिनेमात देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यामध्ये सान्या मल्होत्रा(Sanya Malhotra) आणि विक्रांत मैसी देखील झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर रमण करणार असून शाहरुख खानची रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि दृश्यम फिल्म या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत.

First published:

Tags: Bahubali, Bollywood, Bollywood News, South film