मुंबई, 23 ऑगस्ट: हरियाणातील भाजप नेत्या, टिक टॉक स्टार अभिनेत्री सोनाली फोगट यांचं आज गोव्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. सोनाली या 42 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या परिवारावर शोककळा निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सोनाली यांच्या मृत्यूनंतर अनेक शंका देखील उपस्थित केल्या जात आहेत. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सोनाली यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. सोनाली यांना हार्ट अटॅक आला की त्यांचा घातपात करण्यात आला असे प्रश्न अनेकांना पडले आहेत. दरम्यान गोवा पोलिसांनी सोनाली यांच्या मृत्यूबाबत मोठी अपडेट दिली आहे. सोनाली यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूवेळी सोनाली यांच्या शरिरावर कोणत्याही प्रकारच्या दुखापतीच्या खुणा आढळून आल्या नाहीत, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून सोनाली यांचा शॉर्ट पोस्टमार्टम रिपोर्ट लवकरच मिळेल अशी महत्त्वाची माहिती गोवा पोलिसांनी दिली आहे. हेही वाचा - Sonali Phogat : ‘तिच्या जेवणात काही तरी…’; सोनाली फोगटच्या मृत्यूनंतर बहिणीचा खळबळजनक आरोप दरम्यान सोनाली फोगट यांच्या मृत्यूनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान सोनालीच्या बहिणीनं एक खळबळजनक आरोप केला आहे. सोनालीच्या जेवणात काही तरी गडबड होती असा आरोप तिनं केला. सोनालीनं हृदयविकाराचा झटका येण्याआधी आईबरोबर फोन करुन ही शंका व्यक्त करुन दाखवली होती. त्यामुळे सोनाली फोगट यांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता सोनाली यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट लवकरात लवकर येणं महत्त्वाचं ठरलं आहे. हेही वाचा - पतीचा संशयास्पद मृत्यू, भाजप प्रवेश अन् आता सोनाली फोगट यांनीही घेतला जगाचा निरोप, ‘त्या’ 6 वर्षात काय घडलं? मृत्यूच्या 12 तास आधी सोनाली सोशल मीडियावर अँक्टिव्ह होत्या. इन्स्टाग्रामवर त्यांनी मजेदार रिल व्हिडीओ देखील शेअर केला होता.सोनाली या नुकत्याच बिग बॉस 15 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक टेलिव्हिजन सीरियल्समध्येही काम केलं होतं. सोनालीआधी 2016मध्ये सोनाली यांचा पती संजय फोगट यांचाही संशयास्पद मृत्यू झाला होता. हरियामामधील एका फार्म हाऊसमध्ये त्यांचा संशयास्पद मृतदेह आढळला होता. सोनाली या बिग बॉस 15मध्ये सहभागी झाल्या होत्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.