मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

'ही' प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ

गर्लफ्रेंडसोबत लग्न करत असल्याची माहिती देताच  ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. तिनं साखरपुडा देखील उरकल्याची माहिती समोर आली आहे.

गर्लफ्रेंडसोबत लग्न करत असल्याची माहिती देताच ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. तिनं साखरपुडा देखील उरकल्याची माहिती समोर आली आहे.

गर्लफ्रेंडसोबत लग्न करत असल्याची माहिती देताच ही अभिनेत्री चर्चेत आली आहे. तिनं साखरपुडा देखील उरकल्याची माहिती समोर आली आहे.

  • Published by:  News18 Trending Desk
मुंबई,3 नोव्हेंबर-‘ट्वायलाइट’ या चित्रपटामुळे क्रिस्टन स्टीवर्ट( hollywood actress kristen stewart) जगभरात लोकप्रिय झाली. आता क्रिस्टन तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. गर्लफ्रेंडसोबत लग्न करत असल्याची माहिती देताच ती चर्चेत आली आहे. तिनं साखरपुडा देखील उरकल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही हॉलिवूड अभिनेत्री सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. 31 वर्षाच्या क्रिस्टनने मंगळवारी ‘द हावर्ड स्टर्न शो’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये क्रिस्टनने सांगितले की, ती सध्या डिलन मेयरला डेट करत आहे. लवकरच तिच्यासोबत लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती देखील तिने यावेळी दिली. तसेच मेयरनेच मला लग्नासाठी विचारले होते असं देखील क्रिस्टनने यावेळी सांगितलं.
View this post on Instagram

A post shared by Dylan Meyer (@spillzdylz)

क्रिस्टनने शो दरम्यान सांगितलं की,‘मी मेयरला लग्नासाठी विचारणार होते. पण तिनेच मला लग्नासाठी विचारलं. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. क्रिस्टन आणि मेयर यांची ओळख 2019 मध्ये एका कॉमन फ्रेंडच्या पार्टीमध्ये झाली होती. त्यानंतर दोघींच्या भेटी वाढल्या आणि मग काय त्यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. वाचा : करीनाला लागला फॅन्सचा धक्का आणि मॅडम एवढ्या भडकल्या, video viral यापूर्वी क्रिस्टनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मेयरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दोघीही एकमेंकीच्या हाताहात घालून फर्शीवर झोपलेल्या दिसत आहेत. यापूर्वी क्रिस्टन ‘ट्वायलाइट’ चित्रपटातील अभिनेता रॉबर्ट पैटिनसनला देखील डेट केलं आहे. वाचा : 'Aai Kuthe Kay Karte'मधील संजनाचा न्यू शॉर्ट हेअर कट पाहिला का? क्रिस्टन लवकरच ‘स्पेन्सर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती प्रिन्सेस डायनाची भूमिका साकरताना दिसणार आहे.
First published:

Tags: Entertainment, Hollywood

पुढील बातम्या