जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / PHOTO: Happy Birthday रणधीर कपूर; अर्ध्या रात्री काकांसाठी केलं पार्टीचं आयोजन

PHOTO: Happy Birthday रणधीर कपूर; अर्ध्या रात्री काकांसाठी केलं पार्टीचं आयोजन

PHOTO: Happy Birthday रणधीर कपूर; अर्ध्या रात्री काकांसाठी केलं पार्टीचं आयोजन

आपल्या लाडक्या काकांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व कलाकार एकत्र आले आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई**,** 15 फेब्रुवारी : रणधीर कपूर (Randhir Kapoor) हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांचा 74 वा वाढदिवस आहे. या निमित्तानं संपूर्ण कपूर कुटुंब त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एकत्र आलं आहे. अलिकडेच ऋषी कपूर आणि त्यानंतर राजीव कपूर यांचं निधन झालं. त्यामुळे कपूर कुटुंबात गेले अनेक दिवस दु:खाचं वातावरण होतं. परंतु यावेळी आपल्या लाडक्या काकांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व कलाकार एकत्र आले आहेत. त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. रणधीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका खास पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीत आलिया भट्ट (Alia Bhatt), रणबीर कपूर, करीना कपूर (Kareena Kapoor), सैफ अली खान (Saif Ali Khan), बबीता कपूर, करिश्मा कपूर (Karishma Kapoor) नीतू कपूर रिद्धिमा कपूर आणि मुलं यांनी हजेरी लावली होती. शिवाय बॉलिवूडमधील इतरही नामांकित कलाकार या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी आपल्या लाडक्या कलाकारांना पाहण्यासाठी चाहत्यांनी देखील रणधीर यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. या सर्व कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
जाहिरात

अवश्य पाहा -  हा आहे शनायाचा रिअल लाईफ गुरुनाथ; कशी पडली NRI तरुणाच्या प्रेमात? रणधीर कपूर हे बॉलिवूडमधील एक अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. 1959 साली दो उस्ताद या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर कल आज और कल, रामपुर का लक्ष्मण, जवानी दिवानी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. दरम्यान त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती कसमे वादे या चित्रपटातून. या चित्रपटानंतर त्यांचं देखील नाव बॉलिवूडमधील आघाडिच्या कलाकारांमध्ये घेतलं जाऊ लागलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात