मुंबई 14 फेब्रुवारी : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनिल सध्या आपल्या लव्ह लाईफमुळं प्रचंड चर्चेत आहे. वर्षाच्या सुरुवातीस तिनं एका तरुणासोबतचा फोटो शेअर करुन आपल्या रिलेशनशिपबाबत चाहत्यांना सांगितलं. ती आदित्य बिलागी नामक एका तरुणाला डेट करतेय. दोघंही आपले फोटो आणि व्हिडीओज सोशल मीडियावर सतत शेअर करत असतात. परंतु आदित्य आणि रसिकाची भेट झाली तरी कुठे? कसे दोघं एकमेंकांच्या प्रेमात पडले? व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं जाणून घेऊया रसिका आणि आदित्यची लव्हस्टोरी. रसिकानं राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं आदित्यसोबतच्या नात्याचा खुलासा केला. ती म्हणाली, “दोन वर्षांपूर्वी आमची ओळख झाली. अमेरिकेतून आलेल्या एका मित्राच्या पार्टीत आमची पहिल्यांदा भेट झाली होती. त्या मित्रानंच आमची ओळख करुन दिली. पार्टीत बोलता बोलता आमची मैत्री झाली. त्यानंतर आम्ही कॉफी किंवा शॉपिंगच्या निमित्ताने सतत भेटू लागलो. पुढे पाहता पहता मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. अन् गेल्या वर्षी त्यानं चक्क विमानतळावर मला प्रपोज केलं. तो माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता. सध्या आम्ही लॉस एंजेलिसमध्ये आहोत. आणि एकमेकांसोबत खूप चांगला वेळ व्यतीत करत आहोत.”
अवश्य पाहा - वेब सीरिजमधील इन्टिमेट दृश्यांवर सेन्सॉरशीपची मागणी; या अभिनेत्रीचा थेट नकार आदित्य मूळचा औरंगाबादचा आहे. इंजिनिअरिंगचं शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तो नोकरीच्या निमित्तानं अमेरिकेत गेला. गेली 9 वर्ष तो लॉस एंजेलिस येथे एका मल्टिनॅशनल कंपनीत सीनियर सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. शिवाय त्याला रसिकाप्रमाणेच नृत्याची आवड आहे. त्याचं एक युट्युब चॅनेल देखील आहे.