नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : 19 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी सीजन 3 (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. सहा दिवस घरात राहिल्यानंतर शनिवारी बिग बॉसची पहिली चावडी रंगली. या चावडीवर महेश मांजरेकरांनी घरातील काही सदस्यांची कानघडणी केली. तर काहींची चांगल्या खेळामुळे पाठही थोपटली. शुक्रवारी आणि शनिवारी घरातील अनेक सदस्यांना महेश मांजरेकरांनी त्यांचं कुठे आणि काय चुकतंय हे सांगितलं, तर काहींना चांगलं खेळत असून खेळ असाच सुरू ठेवण्याचा सल्लाही दिला. बिग बॉसच्या पहिल्या चावडीनंतर आज सोमवारी नव्या आठवड्यात नवा खेळ रंगणार आहे. ‘जोडी की बेडी’ असं या टास्कचं नाव असून खेळाचे नियमही भन्नाट असणार आहेत. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घरात एकटं फिरण्यास सदस्यांना बंदी असणार आहे. हे टास्क आठवडाभर चालणार असल्याने, संपूर्ण आठवडा घरातील सदस्यांना टास्कचे नियम फॉलो करावे लागणार आहे. आठवडाभर नेमून दिलेल्या जोडीदारासोबतच सदस्यांना हा टास्क करावा लागणार आहे. आता घरातील कोणत्या सदस्याला कोणता पार्टनर मिळणार हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. या जोड्या कोणत्या असणार? टास्कमध्ये नक्की काय घडणार? हे आजच्या सोमवारच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सहा दिवस घरात राहिल्यानंतर पार पडलेल्या बिग बॉसच्या चावडीमध्ये स्नेहा वाघ ठरली सर्वात्तम मालकीण ठरली, तर शिवलीला सर्वात वाईट मालकीण म्हणून तिला अधिक मतं पडली.
Bigg Boss Marathi च्या घरात गायत्री पडली प्रेमात, I Love You म्हणत दिला Kiss
पहिल्या आठवड्यातील या टास्कमध्ये विशाल बेस्ट सेवक, तर अविष्कार वाईट सेवक ठरला. पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेमध्ये पाच जण सेफ असून, इतर सदस्य पुढील नॉमिनेशन प्रक्रियेत असणार आहेत. आता या आठवड्यात कोण नॉमिनेट होणार आणि कोण घरात वरचढ ठरणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.