मुंबई, 02 फेब्रुवारी : बिग बॉस 13 रिअलिटी शो आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. यंदाचा शो स्पर्धकांच्या रिअल लाइफमुळे जास्त चर्चेत राहिला. सलमान खाननं रश्मि देसाईचा बॉयफ्रेंड अरहान खानच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला. त्यानंतर त्यानं पारस छाब्राच्या गर्लफ्रेंडबद्दलही या शोमध्ये चर्चा केली. या शोमधील पारस आणि माहिरामधील वाढती जवळीक पारसच्या गर्लफ्रेंडला तितकीशी रुचली नाही. त्यामुळे पारस आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये दुरावा आला. नुकतच पारसची गर्लफ्रेंड आकांक्षा पुरीनं रेड एफ एमला दिलेल्या मुलाखतीत तिला पारस छाब्राशी लग्न करायचं नसल्याचा धक्कादायक खुलासा केला.
पारस छाब्रा आणि आकांक्षा पुरी यांचं नातं आता जवळपास संपल्यात जमा आहे. पारसनं बिग बॉसच्या घरात अशी अनेक वक्तव्यं केली होती ज्यामुळे त्यांच्यामुळे या दोघांचं नातं संपल्याचं त्यानं सुचित केलं होतं. याविषयी रेडिओ जॉकीनं तिला विचारलं असता ती म्हणाली, 'मी एक स्वावलंबी मुलगी आहे आणि मी माझ्या आयुष्यातले निर्णय स्वतः घेऊ शकते. मी स्वतःच या नात्यातून बाहेर पडत आहे कारण मला माझा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे.'
'स्वत:ला हिंदू म्हणत असाल तर...', शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर भडकली
आकांक्षा पुरीला या शोमध्ये रेडिओ जॉकीनं विचारलं, सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज यांच्यापैकी कोणाशी हुक-अप आणि कोणाशी लग्न करायला आवडेल. यावर आकांक्षा म्हणाली, 'मी सिद्धार्थला मागच्या बऱ्याच काळापासून ओळखते. त्यामुळे त्याच्यासोबत मला हुक-अप करायला आवडेल आणि आसिम रियाजसोबत लग्न करायला आवडेल.'
नागिन फेम अभिनेत्रीचा BOLD लुक, बिकिनी फोटोशूट सोशल मीडियावर VIRAL
मागच्या विकेंड का वार एपिसोडमध्ये सलमान खाननं पारसशी आकांक्षासोबतच्या नात्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पारसनं, 'मी शोमध्ये येण्याआधीच तिच्यासोबतचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता मात्र आकांक्षा यासाठी तयार नव्हती.' या एपिसोडनंतर पारस आणि आकांक्षाच्या नात्यात कटूता आली आणि आकांक्षानं हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला.
Fast & Furious 9: जॉन सीना भिडणार विन डिजलला, श्वास रोखून धरणारा धमाकेदार ट्रेलर मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.