मुंबई, 01 फेब्रुवारी : बहुचर्चित अॅक्शनपट फास्ट अँड फ्युरियस 9(Fast And furious 9) चा ट्रेलर (Trailer) रिलीज झाला आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांत या व्हिडिओने युट्यूबवर धुमाकूळ घालत नंबर 1 ट्रेंड झाला आहे. या नव्या सिरीजच्या सिनेमात आहे WWE स्टार जॉन सिना.. जवळपास 4 मिनिटांचा हा ट्रेलर असून अफलातून स्टंट पाहण्यास मिळणार आहे. यात पुन्हा एकदा विन डिजल आणि त्याची फॅमिली टीम खतरनाक मिशनवर निघाली आहे. यावेळी या टीमचा सामना होणार आहे तो जॉन सीना सोबत. जॉन सिनाची या सिनेमात धडाकेबाज एंट्री दाखवण्यात आली आहे.
या ट्रेलरवर जॉन सिना हा डोमचा भाऊ जॅकेबच्या रोलमध्ये आहे. विन आणि जॉनमध्ये जबरदस्त अॅक्शन सीन पाहण्यास मिळणार आहे. तसंच fast & furious tokyo drift मध्ये हॅनचा मृत्यू झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. पण, या 9 व्या भागात त्याने कमबॅक केलं आहे. त्यामुळे हॅन fast & furious tokyo drift मध्ये कसा वाचला हे पाहण्याचं ठरणार आहे. Fast And furious चीही 9 वी सिरीज आहे. याआधीचे 8 ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी केली होती. हा सिनेमा भारतात 22 मे रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात मिशेल रॉड्रिग्ज़, जॉर्डाना ब्रूस्टर, टायरिस गिब्सन,लूडैकरिस आणि नताली एमेनुअल प्रमुख भूमिकेत आहे.

)







