Home /News /entertainment /

'स्वत:ला हिंदू म्हणत असाल तर...', शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर भडकली

'स्वत:ला हिंदू म्हणत असाल तर...', शाहीन बाग गोळीबारावर सोनम कपूर भडकली

शाहीन बागमध्ये गोळीबाराबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच अभिनेत्री सोनम कपूरनही यावर आपलं मत मांडलं आहे.

    मुंबई, 02 फेब्रुवारी : जामिया विद्यापीठानंतर आता शाहीन बागमध्ये गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं. CAA आणि NRC या कायद्याला विरोधाचं केंद्र झालेल्या शाहीन बागमध्ये गोळीबार झाल्यानं खळबळ उडाली आहे. याबाबत देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच अभिनेत्री सोनम कपूरनही यावर आपलं मत मांडलं आहे. शाहीन बागमध्ये झालेल्या गोळीबारानंतर अभिनेत्री सोनम कपूरनं आपलं मत मांडलं. तिनं ट्विटर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं, ‘मी कधी कल्पनाही केली नव्हती की भारतात असं काही होईल. कृपया हे देशाचं विभाजन करत असलेलं राजकारण थांबवा. हे देशात द्वेष पसरवणारं आहे. जर तुम्ही स्वतःला हिंदू समजत असाल तर हे लक्षात घ्या की हा धर्म आपल्याला धर्मासोबतच कर्माबद्दलही शिकवण देतो. हे जे चाललं आहे ते या दोन्ही पैकी एकही नाही.’ Fast & Furious 9: जॉन सीना भिडणार विन डिजलला, श्वास रोखून धरणारा धमाकेदार ट्रेलर सोनमच्या या ट्वीटनंतर काहींनी तिला समर्थन दिलंय तर काहींनी मात्र तिच्यावर टीका केली आहे. काहींनी तुला राजकारण समजत नसेल तर तू करु नको असा टीकात्मक सल्ला दिला. तर दुसऱ्या एका युजरनं, आम्ही काय करावं हे तू आम्हाला शिकवू नये असंही म्हटलं आहे. आणखी एका युजरनं काश्मीरमधून हिंदू पंडितांना पळवून लावल्याची घटना सुद्धा तू लक्षात घ्यावी असं म्हटलं आहे. तिसऱ्या पिढीतली ही अभिनेत्री HOT फोटोशूटमुळे चर्चेत, सोशल मीडियावर PHOTO VIRAL काही दिवसांपूर्वीच जामीया विद्यापीठ परिसरात झालेल्या गोळीबाराचं प्रकरण ताजं असतानाच शाहीन बागमध्येही असाच प्रकार झाल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जामीया विद्यापीठात सुधारित नागरिकत्व कायद्याच्या CAA विरोधात निदर्शनं सुरू असताना एका युवकानं गोळीबार केला. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला होता. तैमुरची बहीण बोलते अजब भाषा! बापलेकीच्या संवादाचा हा CUTE VIDEO होतोय व्हायरल जामीयामध्ये गोळीबार करणाऱ्या त्या माथेफिरू तरुणाचा सत्कार करण्यात येणार असल्याची घोषणा हिंदू महासभेने केली. या विद्यापीठाच्या परिसरात निदर्शने सुरु असताना हा तरुणमध्ये घुसला होता. त्यानंतर त्याने आपल्या जवळच्या पिस्तुलाने गोळी झाडत काही घोषणाही दिल्या होत्या. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. हा तरुण हवेत पिस्तुल दाखवत घोषणाबाजी करत असतानाही पोलिसांनी त्याला रोखलं नाही असा अशी टीका होत आहे.
    Published by:Megha Jethe
    First published:

    Tags: Bollywood, Sonam Kapoor

    पुढील बातम्या