मुंबई, 15 सप्टेंबर- ‘बिग बॉस OTT’ (Bigg Boss OTT) च्या नव्या एपिसोडमध्ये एका मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. सध्या बिग बॉस ott मध्ये फिनाले वीक सुरु आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धक फायनलमध्ये आपली जागा बनवण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करताना दिसत आहे. या फिनाले वीकमध्ये**(Final Week)** कोणीही शोमधून बाहेर जाण्याचा विचारदेखील करू शकत नाही. मात्र ट्रॉफीच्या इतकं जवळ येऊन गायिका नेहा भसीनला**(Neha Bhasin)** बीबी हाऊसमधून बाहेर पडावं लागलं आहे. त्यामुळे तिच्यासोबत घरातील सर्वांच्याच डोळ्यात अश्रू होते.
‘बिग बॉस OTT’ सध्या आपल्या शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. त्यामुळे शोमध्ये सर्व लोक अतिशय म्हणत घेताना दिसत आहेत. तसेच शोमध्ये सर्वकाही अधिका-अधिक कठीण होत चाललं आहे. यामध्ये प्रत्येक स्पर्धकाला आपली जागा बनवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. नुकताच समोर आलेल्या एका नव्या एपिसोडमध्ये शेवटच्या टप्प्यात अर्थातच फिनाले वीकमध्ये गायिका आणि स्पर्धक नेहा भसीनला घरातून बाहेर जावं लागलं आहे. या एपिसोडमध्ये बिग बॉसने आधी शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या चार स्पर्धकांचं नाव जाहीर केलं. यामध्ये सुरुवातीला दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट, शमिता शेट्टी आणि प्रतीक सहेजपाल यांची नवे घेण्यात आली. त्यांनतर राकेश बापट आणि नेहा भसीन यांच्यातील एका स्पर्धकाला शेवटच्या टप्प्यात जागा मिळणार होती. (हे वाचा: Bigg Boss 15: तारक मेहताची सोनूचं नव्हे तर हा अभिनेतासुद्धा झळकणार BB 15 मध्ये? ) फायनलमध्ये आपलं स्थान बनवण्यासाठी या दोघांना एक टास्क देण्यात आला होता. यामध्ये बिग बॉसने दोन वेगळे गेट लावले होते. त्या वेगळ्या गेटमध्ये जाऊन यांना तो उघडण्याचा प्रयत्न करायचा होता. यामधील एक उघडून तो स्पर्धक बाहेरच्या दुनियेत येणार होता अर्थातच तो शोमधून बाहेर होणार होता. तर दुसरा पुनःआ घरात येणार होता म्हणजेच बिग बॉस ottच्या फायनलमध्ये आपलं स्थान काबीज करणार होता. या टास्क दरम्यान नेहा घराच्या बाहेर गेली. तर राकेश पुन्हा घरात परतला. मात्र टास्क सुरु होण्यापूर्वी सर्वांना गार्डन एरियामध्ये एकत्र येण्यास सांगितलं होता. त्यावेळी राकेश आणि नेहाने आपलं मनोगत व्यक्त केलं होता. (हे वाचा: फक्त Met Gala चं नव्हे तर या भारतीय कलाकारांचाही फॅशन सेन्स आहे खतरनाक! ) यावेळी नेहाने सर्वांना आपल्याला सांभाळून घेतल्याबद्दल धन्यवाद दिल होतं. तसेच त्याने प्रतीकचं खास आभार व्यक्त केलं होतं. शोमध्ये प्रतीकसोबत त्याची जोडी बनली होती. या दोघांमध्ये खूपच जवळीकता निर्माण झाली होती. नेहाच्या जाण्याने प्रतीकच्यासुद्धा डोळ्यात अश्रू आले होते. तर दुसरीकडे राकेशने आपलं मत व्यक्त करत घरातून बाहेर गेल्यास आपण शमिताला भेटणार असल्याचं म्हटलं आहे. (हे वाचा: फक्त 5 हजार 500 रुपयांवर मुंबई गाठणारा सोनू आज आहे तब्बल इतक्या कोटींचा मालक ) या महिन्यात टीव्हीवर ‘बिग बॉस 15’ ला सुरुवात होणार आहे. बिग बॉस 15 च्या आधी 6 आठवडे आधी हा शो वूटवर आपलं मनोरंजन करणार असल्याचं आधीच सांगितलं होत. त्यानुसार आत्ता हा शो आपल्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आणि बिग बॉस 15 येण्यासाठी सज्ज झाला आहे.