मुंबई, 15 सप्टेंबर- बॉलिवूड**(Bollywood)** अभिनेता सोनू सूदच्या**(Sonu Sood)** घरी अचानक बुधवारी आयकर विभागाची टीम पोहोचली होती. सर्वे एक भाग म्हणून आयकर विभागाची टीम (Income Tax)अभिनेत्याच्या घरी गेली होती. सोनू सूद संबंधित एकूण ६ ठिकाणांचं सर्वेक्षण यात करण्यात आलं आहे. कोरोना महामारी दरम्यान या अभिनेत्याने एखाद्या देवदूतासारखी लोकांना मदत केली आहे. मदतीसाठी आलेला कोणताही व्यक्ती सोनूकडून मोकळ्या हाताने परतलेला नाही. त्यामुळे सोनूच्या कामाची मोठी प्रशंसा केली जात आहे. तसेच आयकर विभागाच्या सर्वेक्षणा नंतर सोनू सूदची संपत्ती आणि त्याची नेटवर्थ(Networth) किती आहे? हे जाणून घेण्याची प्रत्येक चाहत्याला उत्सुकता लागली आहे. आपण आज याबद्दलच जाणून घेणार आहोत.
दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, सोनू सूद फक्त ५ हजार ५०० रुपये घेऊन मुंबईमध्ये आला होता. मात्र आज या अभिनेत्याकडे तब्बल १३० कोटींची संपत्ती आहे. काही हजारांवर मुंबई गाठलेला हा अभिनेता आज कोट्यवधींचा मालक आहे. caknowledge.com ने दिलेल्या एका रिपोर्टनुसार, अभिनेता सोनू सूद आपल्या पत्नी व मुलांसोबत मुंबईमध्ये राहतो. त्याच्याजवळ सप्टेंबर २०२१ पर्यंत १३० कोटी रुपयांची संपत्ती होती. म्हणजेच तब्बल १७ मिलियन डॉलर. अभिनेता सोनू सूद हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. त्याचबरोबर सोनू तेलुगू, पंजाबी आणि कन्नड चित्रपटांत सुद्धा काम करतो. तसेच तो विविध ब्रँडसाठी जाहिरातीदेखील करतो. हेच त्याच्या इन्कमचं मुख्य स्तोत्र आहे. (हे वाचा: सोनू सूदच्या मुंबईतील घरी आयकर विभागाची टीम; सहा ठिकाणी केली पाहणी ) चित्रपटांमध्ये खलनायक म्हणून शोभणारा सोनू रियल लाईफमध्ये मात्र एक सुपरहिरो आहे. त्याने जवजवळ ७० चित्रपटांत काम केलं आहे. इतकंच नव्हे तर शक्ती सागर प्रोडक्शन हाऊस या नावाने त्याचं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस आहे. या प्रोडक्शन हाऊसचं नावसुद्धा खास आहे. कारण हे नाव सोनुने आपल्या वडिलांच्या नावावरून ठेवलं आहे. या रिपोर्टनुसार सोनू एका चित्रपटासाठी तब्बल २ कोटी इतकं मानधन घेतो. (हे वाचा: या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मेहुणा अडकला अफगाणिस्तानात; महिन्याभरात नाही झाला संपर्क ) अभिनेता सोनू सूदकडे घर आणि कार याचंसुद्धा मोठं कलेक्शन आहे. लोखंडवालासोबत मुंबईमध्ये अन्य दोन ठिकाणी सोनूचे फ्लॅट आहेत. तसेच जुहूमध्ये एक हॉटेलसुद्धा आहे. त्याचबरोबर सोनूकडे मर्सिडीज, ऑडी आणि पोर्ष पनामासारख्या गाड्यांचाही समावेश आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळात सोनू सूद एखाद्या देवदूतासारखा लोकांच्या मदतीला धावून आला होता. लोकांच्या मदतीसाठी तो २४ तास तटस्थ होता. यासाठी त्याने अनेक टीमसुद्धा नेमल्या होत्या. आपल्या या दिलदारवृत्तीनं त्याने अनेक लोकांना जीवनदान दिलं आहे. त्यामुळे देशातील लोक त्याला अक्षरशः देवदूत समजून त्याची पूजा करत आहेत.