सध्या जगभरात 'मेट गाला २०२१'ची जोरदार चर्चा सुरु आहे. मेट गालामध्ये कलाकारांनी घातलेले ड्रेस पाहून सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत. या विचित्र फॅशनमुले त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्लीदेखील उडवली जात आहे. मात्र फक्त मेट गालाच नव्हे तर आपल्या बॉलिवूडमध्येही असे काही कलाकार आहेत. जे अशा विचित्र फॅशनममुळे ओळखले जातात.
जेव्हा विचित्र फॅशन स्टाईलची चर्चा होते. तेव्हा यामध्ये सर्वात वर नाव अभिनेता रणवीर सिंगचं येतं. रणवीर नेहमीच अशा अतरंगी फॅशनमुळे चर्चेत असतो. पोल्का डॉट शर्ट आणि त्यावर ग्लिटरी स्ट्रिप्ड ट्राऊझर फक्त रणवीरच घालू शकतो.
रणवीर सिंग आपल्या या अतरंगी फॅशनमुळे नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होत असतो. तसेच त्याचावर अनेक मिम्ससुद्धा तयार होत असतात. मात्र रणवीर आपला हटके अंदाज कधीच नाही सोडत. तो नेहमी हटके लूकमध्ये दिसून येतो.
छोट्या पडद्यावरील बोल्ड क्वीन म्हणून अभिनेत्री निया शर्माला ओळखलं जात. निया नेहमीच बोल्ड अंदाजात दिसून येते. मात्र निया आपल्या अतरंगी फॅशनमुळेही नेहमीच चर्चेत असते. नियाला अनेकवेळा हटके लूकमध्ये पाहण्यात आलं आहे.
बॉलिवूडची दबंग गर्ल म्हणून अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाला ओळखलं जातं. सोनाक्षीसुद्धा बऱ्याचवेळी अतरंगी लुक्समध्ये दिसून येते. सुंदर ड्रेसवर ब्लॅक ब्लेझर फक्त सोनाक्षीच घालू शकते.
अभिनेत्री सोनम कपूरला अनेक लोक लेडी रणवीर सिंगदेखील म्हणतात. कारण रणवीरसारखंच सोनम नेहमी अतरंगी पोशाखात दिसून येते. तिच्या फॅशन सेन्सचा कोणी अंदाजच लावू शकत नाही. अशा विविध लुक्समध्ये ती दिसून येते.