मुंबई, 16 सप्टेंबर- ‘बिग बॉस OTT’ नंतर नुकताच ‘बिग बॉस 15’ (Bigg Boss 15) चे प्रोमो सर्वत्र झळकत आहेत. प्रेक्षकांना मोठ्या आतुरतेने सीजन 15 ची प्रतीक्षा लागली आहे. सलमानने यावेळी जंगल थीम असणार याचा थोडासा अंदाज दिला आहे. त्यामुळे चाहते खूपच उत्सुक झाले आहेत. मात्र सीजन 15 मध्ये कोणते कलाकार स्पर्धक म्हणून येणार याची उत्सुकता अजूनही ताणून राहिली आहे. तत्पूर्वी काही कलाकारांच्या नावाच्या मोठ्या चर्व्ह सुरु आहेत.
सध्या सोशल मीडियावर दोन नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. हे दोन्ही प्रसिद्ध कलाकार बिग बॉस 15 मध्ये झळकू शकतात असं म्हटलं जात आहे. यातील पहिलं नाव आहे अभिनेत्री निधी भानुशाली. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या प्रचंड लोकप्रिय मालिकेत भिडे गुरुजीची कन्या अर्थातच सोनू होय. सोनूने तारक मेहता मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. यामध्ये तिची पहिली सोनू झील मेहताच्या जागी वर्णी लागली होती. काही वर्षे मालिकेत काम केल्यांनतर शिक्षणासाठी निधीने हि प्रसिद्ध मालिका सोडली होती. (हे वाचा: Bigg Boss मराठी’ सीजन 3 मध्ये हे प्रसिद्ध कलाकार असणार स्पर्धक ? ) मात्र चाहते आजही निधीला सोनू या नावानेच ओळखतात. निधी सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आपले अपडेट्स देत असते. निधी सध्या खूपच हॉट आणि बोल्ड झाली आहे. सतत आपल्या बोल्ड लुकने सोशल मीडियाचं तापमान वाढवत असते. निधीच्या बोल्डनेसची नेहमीच सोशल मीडियावर चर्चा असते, (हे वाचा: या थीमवर आधारित आहे ‘Bigg Boss Marathi’चं नवं घर; नवी अपडेट आली समोर ) मात्र सध्या निधी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. हे कारण म्हणजे बिग बॉस होय. ‘बिग बॉस 15’ साठी निधी भानुशालीला अप्रोच केल्याचं म्हटलं जात आहे. जर असं झालं तर शोमध्ये बोल्डनेसचा तडक लागणार हे नक्की.
तर दुसरीकडे टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेता रोनित रॉयच्या नावाचीसुद्धा जोरदार चर्चा सुरु आहे. रोनितने अनेक मालिका आणि चित्रपटातून आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. ‘अदालत’या शोमधून तो आपल्या भेटीला येत असतो. त्यामुळे रोनितचा चाहता वर्ग मोठा आहे. रोनित जर बिग बॉस 15 मध्ये झळकला तर त्याच्या चाहत्यांसाठी नक्कीच मेजवानी असणार आहे.मात्र याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.