मुंबई, 27 सप्टेंबर 2021 ; 19 सप्टेंबरपासून बिग बॉस मराठी सीजन (Bigg Boss Marathi 3) सुरू झाला आहे. सहा दिवस घरात राहिल्यानंतर शनिवारी बिग बॉसची पहिली चावडी रंगली. बिग बॉसच्या पहिल्या चावडीनंतर आज सोमवारी नव्या आठवड्यात नवा खेळ 'जोडी की बेडी' रंगणार आहे. सध्या या खेळाची चर्चा असली तरी आतापर्यंत बिग बॉस मराठीचे दोन सीजन आले. हे सीजन खूप गाजले व या सीजनमध्ये अशा काही जोड्या होत्या ज्या सतत एकमेंकाना चिकटून असत. यांना बिग बॉसच्या घरतील लव्ह बर्ड म्हटलं तर वावग वाटायला नको. या घरात जसे मोठमोठे वाद होतात तसे मोठी प्रेम प्रकरण (Bigg Boss Marathi House Love Cupules) देखील जन्म घेत असतात. हा खेळच असा आहे की, मनुष्य सर्व काही विसरून जातो. आज आपण अशा काही बिग बॉसच्या घऱातील लव्हबर्डविषयी (Bigg Boss Marathi House Love Birds) माहिती घेणार आहे ज्यांच्या नावाची, प्रेमाची फक्त घऱातच नाही तर बाहेर देखील चर्चा रंगली होती. यापैकी एका जोडीला तर घरात अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये तक्रार देखील दाखल करण्यात आली होती.
राजेश श्रुंगारपूरे आणि रेशम टिपणीस
बिग बॉस मराठीच्या घऱातील आतपर्यंतच्या दोन सीजनमधील पहिली जोडी म्हणजे राजेश श्रुंगारपूरे आणि रेशम टिपणीस यांची आहे. या दोघांची बिग बॉस मराठीच्या घरात तर चर्चा होतीच मात्र यांची बाहेरच्या जगात देखील तितकीच चर्चा होती. दोघे सतत एकमेंकाच्या मागे मागे असत. खेळात दोघे नेहमी एकत्र दिसत. राजेश व रेशम दोघेही विवाहित होते त्यामुळे त्यांचे असं एकत्र राहणे प्रेक्षकांना खटकत होते. अनेकांनी त्यांच्यावर टीका देखील केली. नाशिकमध्ये तर एका व्यक्तीने त्यांच्याविरोधाता आक्षेपार्ह वर्तन आणि संवाद करत असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. विवाहबाह्य संबंधांना रेश्म आणि राजेश खतपाणी घालत असल्याचा आऱोप या व्यक्तीने केला होता. रेश्म आणि राजेश त्यांच्या नात्यावर कधीच बोलले नाहीत.
वाचा : नव्या आठवड्यात नवा खेळ, Bigg Boss च्या घरात रंगणार 'जोडी की बेडी'चा भन्नाट टास्क
सई लोकूर आणि पुष्कर जोग
बिग बॉस मराठीच्या घऱातील आतपर्यंतच्या दोन सीजनमधील दुसरी जोडी म्हणजे सई लोकूर आणि पुष्कर जोग यांची आहे. राजेश श्रुंगारपूरे आणि रेशम टिपणीस यांच्यातील प्रेम हे आहेत. बिग बॉसच्या घरात राजेश आणि रेशमने अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नाशिकमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.बिग बॉसच्या घरात असताना सईच्या लव्ह लाइफबद्दल तिनं खुलासे केले होते. तसंच पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यात 'कुछ तो गडबड है' अशी चर्चाही रंगली होती. 'बिग बॉस'च्या घरात दोघांचं चांगलं जमत होतं. सई लोकूर घरात अनेकदा पुष्करसोबतच वावरताना दिसलेली. दोघांचं एकमेकांसोबत वेळ घालवणं, सईच्या मनोरंजनासाठी पुष्करनं आयटम नंबरवर डान्स करणं किंवा जेवणावेळी पुष्करच्या ताटात सईनं जेवण करणं. त्यावर घरातल्या इतर सदस्यांनी 'प्यार बाटने से बढता है' म्हणत दोघांची टर उडवणं. या प्रसंगांतून दोघांमधील मैत्रीचं नातं आता नवीन वळण घेतं की काय, अशा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र घरातून बाहेर पडल्यावर सई लोकूरने तिर्थदीप रॉय यासोबत लग्नगाठ बांधली व या चर्चां खोट्या ठरवल्या.
शिव आणि वीणा
बिग बॉस मराठीच्या घऱातील आतपर्यंतच्या दोन सीजनमधील दुसरी जोडी म्हणजे मराठी बिग बॉस सीजन दोनचा विजेता शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांची आहे. या दोघांनी बिग बॉसच्या घऱात प्रेमला कबुली दिली. याच घराच यांच्यातीर प्रेम फुललं. विशेष म्हणजे ही जोडी फक्ता घरातच एकत्र दिसली नाही तर घराबाहेर देखील एकत्र दिसली. दोघंही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत. मध्यंतरी दोघे लग्न करणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर काही दिवसातच दोघांच्यात ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली होती. मात्र या बातम्यावर दोघांकडून कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही.
पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले
बिग बॉस मराठीच्या घऱातील आतपर्यंतच्या दोन सीजनमधील दुसरी जोडी म्हणजे मराठी बिग बॉस सीजन दोनमधील पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले यांची आहे. या सिझनमधील लव्हबर्ड्स होते. परागने अनेवेळा रुपालीसाठी असलेलं प्रेम अप्रत्यक्षपणे व्यक्त केलं. रूपालीने मात्र वारंवार त्याच्या प्रेमाला नकार दिला. ती त्याला एक चांगला मित्र समजत असल्याचे रूपालीने वारंवार सांगितलं आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघे कधी एकत्र दिसले नाहीत. दोघांनीही वेगवेगळा संसार थाटला आहे आणि दोघेही संसारात सुखी आहेत.
यंदाच्या बिग बॉस मराठीच्या सीजनमध्ये अशा काही प्रेम कहाण्या फुलणार का , याची उत्युकता चाहत्यांना लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.