मुंबई, 30 सप्टेंबर : ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बिग बॉस’चे चौथे पर्व येत्या २ ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. टेलिव्हीजनवरचा सगळ्यात सर्वात वादग्रस्त शोम्हणून ‘बिग बॉस मराठी’ आहे. यंदा या कार्यक्रमाची थीम ‘ALL IS WELL’ अशी असणार आहे. बिग बॉसचे नवे पर्व सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. आता शोच्या ग्रँड प्रीमियरचे प्रोमो कलर्स मराठीच्या पेजवर रिलीज केले जात आहेत. या व्हिडिओमध्ये स्पर्धकांचा चेहरा दिसत नसला तरी थोडीशी झलक दिसत आहे. त्यावरून कोण स्पर्धक असतील याचा प्रेक्षक अंदाज लावत आहेत. पण आता सुरु होण्याआधीच बिग बॉस मराठीला प्रेक्षकांकडून ट्रोलिंग झेलावं लागतंय. कलर्स मराठीने नुकतंच बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचे प्रिमिअर सोहळ्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक तरुणी बोल्ड डान्स करताना दिसत आहे. यात तिचा चेहरा दिसत नसला तरी तिच्या डान्सने आणि बोल्ड लूकने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. मात्र प्रेक्षकांना हा प्रोमो फारसा आवडलेला दिसत नाहीये. हा बोल्ड व्हिडीओ पाहून प्रेक्षक चांगलेच संतापले आहेत. या व्हिडिओवर कमेंट करत अनेक प्रेक्षकांनी त्यांची नाराजी व्यक्त केलीये. हेही वाचा - Neha Khan : नेहा खान खरंच दिसणार बिग बॉस मराठी 4 मध्ये? अभिनेत्रीनं केला खुलासा एका प्रेक्षकाने लिहिलंय कि, ‘‘दिलखेचक नाही दिलटोचक वाटतेय अदाकारी’, तर दुसऱ्या प्रेक्षकाने वेगळ्या मुद्द्यावर लक्ष वेधलं आहे. त्याने लिहिलंय कि, ‘असे घाणेरडे डान्स कृपया दाखवू नये ..आम्ही सर्व जण सोबत tv बघतो .खूप खराब..माझा ८ वर्षाचा मुलगा सुद्धा बघतो ..तो हसत होता …मी काहीच बोलूशकली नाही ..स्वामी समर्थ सिरीयल च्या मध्ये हि घाणेरडी add आली ..कृपया भान ठेवावं’. दुसऱ्या एका युजरने लिहिलं आहे कि, ‘वाहिनी मराठी आणि चिंदी गाण्यावर थिल्लर चाळे, ह्या असल्या दर्जाहीन कार्यक्रमासाठी दर्जेदार,श्रवणीय आणि विशेष म्हणजे ह्या पर्वात फक्त मराठी गाणी असलेला असा सूर नवा ध्यास नवा सारखा चांगला कार्यक्रम आटोपता घेतला, मुख्यतः OTP मुळे TV वाहिन्या पाहणारा वर्ग हा 18-35 मधील सोडून इतर वयाचा असतो त्यामुळे असले विचित्र चाळे असलेले कार्यक्रम त्यांना रुचनार एवढही वाहिनी प्रमुखाना कळू नये याचे नवल वाटते’’
त्यामुळे मराठी टेलिव्हिजनवर दाखवण्यात आलेला हा डान्स पाहून प्रेक्षक मात्र चांगलेच नाराज झालेले दिसतायत. त्यामुळे बिग बॉस मराठीच्या रिलीजआधीच त्याने प्रेक्षकांचा रोष ओढवून घेतला आहे. पण सोबतच या व्हिडिओतील चेहरा कोण आहे हे जाणून घेण्याची सुद्धा प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता आहे.
कलर्स मराठीने या प्रोमोला “मंचावर रंगणार दिलखेचक अदाकारी 🔥कोण असतील हे स्पर्धक? BIGG BOSS मराठी” Grand Premiere, 2 ऑक्टोबरला संध्या 7 वा, सोम – शुक्र रात्री 10 वा, शनि- रवि रात्री 9:30 वा फक्त कलर्स मराठीवर”, असे कॅप्शन या व्हिडीओला दिले आहे.